सातारा

शेतक-यांची चिंता वाढली; काेराेनाबराेबरच 'हेही' मोठे संकट

Balkrishna Madhale

सातारा : जुलै अखेर उलटत आला तरी, पावसाने दडी दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, तदनंतर पावसाने केवळ उघडीप दिल्याने पिकांना याचा फटका बसला. यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने यापूर्वीच दिले होते. मात्र, ऐनवेळी पावसाने दडी दिल्याने शेतक-यांची पुरती निराशा झाली आहे.
माण तालुक्‍यात कोरोनाचे शतक

हवामान खात्याने जुनच्या पहिल्या आठवड्यातच शुभ संकेत देत शेतक-यांना काही अंशी दिलासा दिला होता, त्यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी करत भरघोस पीक काढण्याचे योजिले होते. मात्र, ऐनवेळी पावसाने दडी दिल्याने शेतक-याचा हंगामी मेळ विस्कटला आहे. जिल्ह्यात जुलै अखेर 4932.92 मिलीमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सातारा तालुक्यात 332.03 मिलीमीटर, जावलीत 577.86, पाटणमध्ये 529.32, कराडला 263.85, कोरेगावात 228.89, खटावमध्ये 244.50, माणला 209.00, फलटणमध्ये 215.00, खंडाळ्यात 173.35, वाईत 315.20 तसेच  महाबळेश्वरमध्ये 1843.93 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.

कोरोनामुळे मी बंदीस्त झाले आहे, तुम्ही स्वत: ला सांभाळा

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर पडताच उदयनराजे म्हणाले, ते सहमत आहेत

सातारा जिल्ह्यात अपेक्षीत इतका पाऊस न झाल्याने पिकांवर मोठे संकट ओढवले असून पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जिल्ह्यात भात, ज्वारी, ऊस, स्ट्रॉबेरी, घेवडा इत्यादी मुख्य पीकं घेतली जातात, परंतु पावसाने दडी दिल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आज संपूर्ण जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे, त्यातच वरुणराजाने शेतक-यांना निराश केल्याने शेतकरी पुरता खचून गेला आहे. आज घडीला जिल्ह्यात पावसाचे प्रमाण पाहिले असता, एकदम जेमतेम असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. पाऊस नसल्याने पीकं वाळून जात आहेत, तर पिकांवर किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. कृषी विभागही कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने बी-बियाणे, औषध मिळण्यास दिरंगाई होत असून शेतक-यांची परवड होत आहे, त्यातच बदलत्या हवामानाचा देखील पिकांना फटका बसत असून पीकं कुजून जात आहेत. जिल्ह्यातील कोयना, कण्हेर, धोम, उरमोडी या धरणांत पुरेसा पाणीसाठा असला, तरी शेतक-यांना याचा कितपत लाभ होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संपादन : संजय शिंदे 

व्वा... या हॉस्पिटमध्ये 392 कोरोना बाधितांवर मोफत उपचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT