सातारा

शिक्षण विभागाची दिशाभुल पडली महागात; शाळेची RTE मान्यता झाली रद्द

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : गणेशपेठ रुईघर येथील स्वीट मेमरिज या निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची आर टी ई मान्यता रद्द केल्याचे पत्र सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांनी दिले आहे. यामुळे पाचगणीच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मु पो पाटखळ तालुका जिल्हा सातारा येथील राजेंद्र गोरखनाथ काळे यांनी याबाबत आपले सरकार टोकणवर तक्रार नोंदवली होती. त्यांनी २२ जानेवारी २०२१ रोजी तक्रार निवारण प्रणालीवर अर्ज केला होता.

यानुसार स्वीट मेमरी हायस्कूल रुईघार ही शाळा सन १९९५ साली महाबळेश्वर तालुक्यातून जावली तालुक्यातील रुईघरया ठिकाणी स्थलांतरित आहे. त्यामुळे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कलम १८ अन्वये सदर अर्जाची शिक्षण अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यावर एक मे 2019 ते 31 मार्च 2022 अखेर दिलेली आर टी ई मान्यता रद्द करीत आल्याचे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी कळवले आहे.

स्थलांतरण असूनही याकडे शिक्षण विभागाने डोळेझाक केली असा ही प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. दरम्यान आर टी ई मान्यता रद्द झाल्याची घटना सातारा जिल्ह्यात तसेच पाचगणीतील शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच घडल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पाेलिसांनी पकडल्यानंतर गजा मारणे म्हणाला, फक्त दोनच दिवस राहिले होते

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT