Scholarship Exam Study Tips sakal
सातारा

Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त टिप्स

तयारी अंतिम टप्प्यात, आत्मविश्‍वासाने सामोरे जाण्याचा शिक्षकांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

Scholarship Exam Study Tips: भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी आणि शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा अशी ओळख असणारी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. १२) एकाच दिवशी होत आहे.

शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांकडून प्रश्नसंच सोडविणे, सराव परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांना टिप्स देणे या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करवून घेण्यात येत असून ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या रविवारी होत आहे. कोणताही ताण न घेताना आणि मोठ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असा सल्लाही शिक्षकांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त टिप्स

विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वाचावीत

जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात

अभ्यासक्रमातील अवघड वाटणाऱ्या भागाची अधिकाधिक उजळणी करावी

परीक्षेवेळी ही काळजी घ्यावी

  • प्रश्न काळजीपूर्वक वाचावेत आणि सोडवावेत

  • प्रश्न सोडविल्यानंतर लगेच त्याचे उत्तर उत्तरपत्रिकेत अचूक नोंदवावे

  • उत्तरपत्रिकेतील वर्तुळे रंगविण्यासाठी बॉलपेन वापरावा

  • उत्तरपत्रिकेतील गोल व्यवस्थित रंगवावेत

  • वेळ आणि प्रश्न सोडविणे यांची योग्य सांगड घालावी

  • अवघड वाटणारे प्रश्न शेवटी सोडवा

उत्तराच्या पर्यायाचा गोल रंगविताना प्रश्न क्रमांक आणि उत्तरसूचीतील क्रमांक योग्य आहे की नाही, हे तपासावे

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभरापासून विद्यार्थ्यांची तयारी केली जाते. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या तीन सराव परीक्षा घेतल्या जात असून, एकूण १५० प्रश्‍नपत्रिका सोडवून घेतल्या जातात.

त्यामुळे जे विद्यार्थी काही विषयात कमी आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते, तसेच सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडविण्यावर भर दिला जात असल्याने प्रत्यक्षात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचण येत नाही.

- अर्जुन कोळी, मुख्याध्यापक,कऱ्हाड नगरपालिका शाळा क्रमांक ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT