सातारा

शिक्षणमंत्र्यांचं सर्व काही ऐकलं! आम्हांला काहीच नाही मिळालं; शैक्षणिक संस्थांची नाराजी

प्रशांत घाडगे

सातारा : वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रवेश मिळावा, या उद्देशाने शासन ऑनलाइन आरटीई अंतर्गत खासगी संस्थांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविते. मात्र, मागील वर्षापासून आरटीई अंतर्गत प्रवेश दिलेल्या संस्थांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या रकमेची प्रतिपूर्ती अद्याप केली नसल्याची बाब उघड झाली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थेतील आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी शासनामार्फत चालना देण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेनंतर शासनामार्फत आरटीई प्रवेश देणाऱ्या संस्थांना रक्कम अदा करण्यात येते. परंतु, शासनाकडून अद्यापही 2019-20 वर्षातील रक्कम आली नसल्याने खासगी संस्था प्रतिपूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पात्र 122 शाळांमध्ये आरटीई प्रवेश दिला जात आहे. 

दरम्यान, 2017-18 व 2018-19 मध्ये आरटीईच्या प्रतिपूर्ततेची रक्कम रखडलेली होती. मात्र, त्यानंतर निधी आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एकत्रित सुमारे सात कोटींची रक्कम संस्थाचालकांना अदा केली होती. मात्र, पुन्हा 2019-20 च्या अनुदानित रकमेचा खोळंबा झाल्याचे दिसून आले आहे. कोविडच्या संकटामुळे निधी अडकून पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत आरटीईची रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही रक्कम शासनामार्फत मिळाली नसल्याचे अनेक संस्थाचालकांनी सांगितले आहे. 

दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काेविड 19 या काळात शैक्षणिक संस्थांना जे निर्देश दिले. त्या सर्वांचे आम्ही पालन केले. शैक्षणिक शु्ल्क वाढवू नका सांगितले नाही वाढवले, शुल्क घेण्याबाबत सक्ती करु नये नाही केली. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरु राहावे यासाठी आधूनिक यंत्रणा उभी केली. हे सर्व करुनही अद्याप आम्हांला शासनाने काेणतेच आर्थिक पाठबळ दिले नाही. सातारा जिल्हा परिषदेतील  शिक्षण विभागातील कर्मचा-यांनी युद्धपातळीवर प्राप्त प्रस्तावांच्या त्रुटी काढून त्या संबंधित शाळांना कळविल्या पाहिजेत अशी अपेक्षा आम्हांला असल्याचे काही शिक्षण संस्थाचालकांनी ई-सकाळशी बाेलताना सांगितले. 


जिल्ह्यात चालू शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश देण्यात आला आहे. यापूर्वीची 2017-18 व 2018-19 या वर्षातील रक्कम देण्यात आली आहे. मात्र, 2019-20 वर्षातील रक्कम अद्यापपर्यंत आली नाही. आरटीई प्रवेशाची प्रतिपूर्ततेची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
 
-प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT