सातारा

ग्रामपंचायतींनंतर 'कृष्णा'ची रणधुमाळी; जिल्ह्यातील 1348 संस्थांच्या निवडणुकीस पात्र

उमेश बांबरे

सातारा : मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल केलेले आहे. त्यातच ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून सूचना येण्याची वाट सहकार विभाग पाहात आहे. जिल्ह्यातील 1348 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची तयारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला करावी लागणार आहे.
 
कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ दिली होती. सुरवातीला तीन महिने व त्यानंतर सहा महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदतवाढ 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचाही बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणुका अशा पद्धतीने घ्यायच्या याबाबतच्या सूचनांची वाट सहकार विभाग पाहात आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांमध्ये "अ' वर्गातील सहा, "ब' वर्गातील 583, "क' वर्गातील 497, तर "ड' वर्गातील 308 सहकारी संस्थांचा समावेश आहे. या एकूण 1348 संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षात होणार आहेत. यामध्ये प्रमुख साखर कारखाने, जिल्हा बॅंकेसह विविध सहकारी बॅंका आणि पतसंस्था, तसेच विकास सेवा सोसायट्यांचा समावेश आहे.

संचालकांकडून स्वतःच्या संस्थांची कर्जे माफ; राजकारण अन्‌ विधानसभा डोक्‍यात ठेऊन प्रकल्पांच्या अनेक घोषणा!
 
या निवडणुकांसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कोरोनापूर्वी सर्व तयारी करून ठेवलेली आहे; पण निवडणूक प्राधिकारण मागील ठराव, मतदार याद्या पुढे ग्राह्य धरायच्या का, याबाबतची सूचना उपनिबंधक कार्यालयांना करणार आहे. त्यामुळे जानेवारी 2021 मध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्‍चित आहे; पण कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिली जाण्याचीही शक्‍यता नाकारता येणार नाही. सध्यातरी कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा बॅंकेचे ठरावही नव्याने करावे लागणार..? 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठरावाची प्रक्रियाही करण्यात आली होती. आता मुदतवाढीनंतर नव्याने निवडणूक प्रक्रिया होत असताना जिल्हा बॅंकेसाठी विकास सेवा सोसायटींचे ठराव बदलावे लागणार आहेत. त्यामुळे संचालकांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या गृहनिर्माण आणि दूध संस्थांची मते कमी झालेली आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी सहकारी दूध संस्था कमी झालेल्या आहेत. त्यामुळे या संस्थांची मते कमी होणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतदारांचा आकडा कमी होणार असल्याने मतदारांना भाव येण्याची शक्‍यता आहे. 

मुदत संपलेल्या सहकारी संस्था 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक, कृष्णा सहकारी साखर कारखाना, काही अर्बन व सहकारी बॅंका, विकास सेवा सोसायटींसह पतसंस्थांचा समावेश आहे.

सैदापुरातील सासवे कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू; अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Currency Racket Kolhapur : कोल्हापुरात बनावट नोटांचे रॅकेट, हजारोंच्या नोटांसह प्रिंटर ताब्यात; गोठ्यात करत होते कारनामा

Rishabh Pant is Back! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजांशी गमतीशीर संवाद, Video व्हायरल

फेक कॉल सेंटरचा मास्टरमाइंड फारुकीला गोव्यात ठोकल्या बेड्या; अलिशान सात कार केल्या जप्त, पोलिसांना टिप मिळाली अन्...

Sudhir Gadgil Letter Bomb : सांगली भाजपमध्ये उपऱ्यांचे इनकमींग, आमदार सुधीर गाडगीळांचा लेटरबॉम्ब; पालकमंत्र्यांची दिशाभूल

Gold Price Drop : दिवाळीनंतर सोन्याचे दर गडगडले! ८ दिवसांत सोन्यात ११,७००, तर चांदीत १७ हजारांची घसरण.

SCROLL FOR NEXT