Karad Vidhansabha Election Sakal
सातारा

Karad Assembly Election 2024: कऱ्हाडला मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Karad Vidhansabha Election 2024: उत्तर, दक्षिणचा निकाल दुपारी एकपर्यंत अपेक्षित; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

सकाळ डिजिटल टीम

कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी उत्साहात मतदान झाले. कऱ्हाड दक्षिणसाठी ७६.३२ टक्के, तर कऱ्हाड उत्तरसाठी ७४.७३ टक्के शांततेत मतदान झाले. मतदानानंतर आता निवडणूक यंत्रणा मतमोजणीच्या तयारीत व्यस्त आहे. कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघांत मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी २३ दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे. मतमोजणीच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

उत्तर- दक्षिणेत चुरशीने मतदान

कऱ्हाड उत्तरमध्ये एकूण मतदार तीन लाख सहा हजार २०३ होते. त्यापैकी एक लाख १८ हजार ४५५ पुरुष, तर एक लाख १० हजार ३७२ महिला आणि इतर तीन अशा दोन लाख २८ हजार ८३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कऱ्हाड उत्तरमध्ये ७४.७३ टक्के मतदान झाल्याची माहिती कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, बाळासाहेब गावडे व डॉ. जस्मिन शेख यांनी दिली. कऱ्हाड दक्षिणमध्ये तीन लाख १५ हजार ४२० मतदार होते.

त्यापैकी एक लाख २३ हजार ८९६ पुरुष, एक लाख १६ हजार ८३५ महिला आणि इतर १२ अशा दोन लाख ४० हजार ७४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कऱ्हाड दक्षिणमध्ये ७६.३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील यांनी दिली.

सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ

कऱ्हाड उत्तरची मतमोजणी नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, उमेदवार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत, तर कऱ्हाड दक्षिणची मतमोजणी शासकीय धान्य गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व उमेदवार प्रतिनिधींच्‍या उपस्थितीत सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतदान मोजले जाणार आहे. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होईल. कऱ्हाड दक्षिणमध्ये मतमोजणीसाठी एकूण ३३ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामध्ये एक ते १० टेबल हे टपाली मतमोजणीसाठी आणि ११ ते ३० टेबल हे मतदान यंत्राची मते मोजण्यासाठी, तर ३० ते ३३ नंबरच्या टेबलवर सैनिकांची मतमोजणी केली जाईल. मतदान यंत्राच्या मतमोजणीसाठी असलेल्या २० टेबलवर मोजणीचे १७ ते १८ राउंड होतील. मतमोजणीसाठी सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्‍यात आली आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये मतमोजणीसाठी ३० टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये टपाली मतमोजणीसाठी नऊ टेबल, मतदान यंत्राची मोजणी करण्यासाठी १४ टेबल आणि सैनिकांच्या मतमोजणीसाठी सात टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतदानाचे मतदान मोजले जाईल. त्यानंतर मतदान यंत्रांची मते मोजली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नेमलेले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चव्हाण आणि दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. म्हेत्रे यांनी प्रशिक्षण दिले. त्यामध्ये त्यांनी मतमोजणीदरम्यान कोणती काळजी घ्यावी, मतमोजणी कशी करावी? याबाबत मार्गदर्शन करून काही अडचण असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.

स्‍ट्राँग रूमला मोठा बंदोबस्त

कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर काल रात्री मतदान यंत्रे व साहित्य येथे जमा करण्यात आले. त्यानंतर स्‍ट्राँग रूमला मतदान यंत्रे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सील करून ठेवण्यात आली आहेत. तेथे राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ती स्ट्राँगरूम शनिवारी मतमोजणीसाठी पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार प्रतिनिधींच्‍या उपस्थितीत सील काढून उघडण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीस प्रारंभ होईल.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT