सातारा

माणमध्ये राजकीय वातावरण तापणार; तालुक्‍यातील 61 गावांत रंगतदार लढती

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील 95 पैकी 61 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असल्याने आता राजकीय वातावरण तापणार आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्यामुळे गाव पुढाऱ्यांची कसरत होणार आहे. 

माणमधील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकीनंतर शांत होते. मध्येच बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीवरून थोडा गदारोळ माजला होता. तर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत थोडी हालचाल जाणवली. पण, खऱ्या अर्थाने राजकीय वातावरणातील गरमागरमी ग्रामपंचायत निवडणुकीत दिसणार आहे. या निवडणुकीत गल्लीपासून मुंबईपर्यंतचे कधीकधी दिल्लीपर्यंतचे नेते सहभागी होताना दिसतात. 

माणमधील 95 पैकी 61 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झालेली आहे. यात मार्डी, लोधवडे, कुकुडवाड, गोंदवले बुद्रुक, देवापूर, वर-म्हसवड, राणंद, शिंगणापूर, वडजल, पिंगळी बुद्रुक या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दहिवडी मंडलातील चार, मार्डी मंडलातील 11, मलवडी मंडलातील दहा, म्हसवड मंडलातील सात, गोंदवले बुद्रुक मंडलातील 12, कुकुडवाड मंडलातील आठ आणि शिंगणापूर मंडलातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बोथे, श्रीपालवणसह कारखेल, पळसावडे या माणच्या विरुध्द सीमांवरील गावांमध्ये निवडणूक असल्यामुळे एक प्रकारे संपूर्ण माणमध्येच निवडणुकीचे वातावरण असणार आहे. 

प्रथमच निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण जाहीर होणार असल्याने गावपुढाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. नक्की कुणाला? कुठे उभे करायचे, स्वतः निवडणूक लढवायची की अर्धांगिनीला मैदानात उतरावयाचे, याचे मोठे कोडे सर्वांनाच पडले आहे. मोठा खर्च करून निवडणूक लढवली अन्‌ सरपंच आरक्षण दुसरे पडले तर काय करायचे, याची विवंचना सर्वांना लागून राहिली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return : वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT