सातारा

अकरावी प्रवेशाची 'कट ऑफ लिस्ट' शुक्रवारी; वायसी, डीजीला पसंती

Balkrishna Madhale

सातारा : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी नोंदणी करत आहेत. अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांत दाखल झालेल्या अर्जांची संख्या यंदाही लक्षणीय होती. गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी ऐच्छिक महाविद्यालयांबरोबरच पर्याय म्हणून अन्य महाविद्यालयांत प्रवेश अर्ज दाखल केल्याचे चित्र आहे. परिणामी, यंदाही विविध महाविद्यालयांमध्ये अर्जाचा फुगवटा दिसत आहे. 

दहावीचे मूळ गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर १८ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात केली. यंदा विद्यार्थ्यांचा गुणात्मक निकाल उत्तम लागल्यामुळे सरासरी ऐंशीहून अधिक टक्के गुण मिळविणा-या बहुतांशी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेकडे जाण्याचं निश्चित केलं, तर वाणिज्य शाखेलाही मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. 

शहरातील नामवंत महाविद्यालयांना पहिली पसंती देत विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. त्यानंतर पर्याय म्हणून अन्य पसंतीच्या महाविद्यालयाची निवड करुन तिथंही आपला अर्ज दाखल केला आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्य काॅलेज (उपलब्ध जागा-१८००, अर्ज प्राप्त ४५७८), धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय (उपलब्ध जागा-४५०, अर्ज प्राप्त-२३९८), छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला शाखा (उपलब्ध जागा-७२०, अर्ज प्राप्त-७२८), लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय (विज्ञान : उपलब्ध जागा-४८०, अर्ज प्राप्त-९७०), (वाणिज्य : उपलब्ध जागा-३६०, अर्ज प्राप्त-६२३)  या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती संबंधित महाविद्यालयातून देण्यात आली.

येत्या शुक्रवारी (ता. २८) गुणवत्तेनुसार प्रवेशाची पहिली यादी जाहीर होईल. सातारा जिल्ह्यातील एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जाईल. महाविद्यालयांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन प्रवेश प्रक्रिया राबवावी. 
-राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT