सातारा

ललिता बाबर, किरण भगतचे गाव एकवटले; ग्रामपंचायतीत महिलाराज

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : ऑलिम्पियन ललिता बाबर व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचे गाव असलेल्या मोही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावक-यांनी सर्वानुमते 11 महिलांची निवड ग्रामपंचायत सदस्यपदासाठी केली आहे.
 
ललिता बाबर व किरण भगत या खेळाडूंचे गाव म्हणून मोहीची ओळख आहे. या गावाची ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीने लढली जाते. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायचीच, असा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. मात्र, काही पारंपरिक राजकीय मंडळींची यंदाही फडात उतरण्याची आंतरिक इच्छा होती. पण, गावाचा निर्णय त्यांनीही मान्य केला. ग्रामस्थांच्या बैठकीत गावातील ज्येष्ठ पाच मान्यवरांची समिती नेमण्यात आली. बिनविरोधचे संबंधित सर्व अधिकार या समितीला देण्यात आले. या पाच सदस्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल असे बैठकीमध्ये सर्वानुमते ठरले. त्यानुसार या पाच सदस्यांनी यावेळी गावात महिलाराज आणण्याचा निर्णय घेतला.

टेबललॅण्ड, सिडने पॉईंटसह वेण्णालेकच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार; काेट्यावधींचा निधी

कोल्हापूरच्या ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या पन्हाळा आणि पावनगड पाहता येतो या वास्तुतून  

गावातील 11 महिलांची सदस्य म्हणून अर्ज भरण्यासाठी निवड करण्यात आली. मंदाकिनी मानसिंग राऊत, पद्मिनी पांडुरंग देवकर, कल्पना बाळासाहेब पिसाळ, रसिका अशोक देवकर, सविता विजय देवकर, शीतल बापूराव सुतार, पारुबाई पांडुरंग नेटके, बायडाबाई पोपट मसगुडे, सुनीता विनायक जाधव, सुमन दगडू देवकर व वंदना श्रीमंत पवार या 11 महिलांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. फक्त 11 महिलांचेच अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोहीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी, आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, पोलिस पाटील, पत्रकार, महिला, ग्रामस्थ व युवकांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले.

'श्रीं'चा पुण्यतिथी महोत्सव गुरुवारपासून; गोंदवले यात्रेची संभ्रमावस्था

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT