Collector Jitendra Dudi esakal
सातारा

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरच्या अतिक्रमणांवर दोन दिवसांत हातोडा पडणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील अतिक्रमणांवर दोन दिवसांत पुन्हा कारवाई सुरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

गतवेळच्या गडचिरोली जिल्ह्याचे रेकॉर्ड साताऱ्याला मोडायचा आहे, असा संकल्प आम्ही केला आहे.

सातारा : महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील अतिक्रमणांवर दोन दिवसांत पुन्हा कारवाई सुरू होणार आहे. त्यापूर्वी संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमणे हटवावीत. कोणीही नव्याने अतिक्रमणे करू नयेत, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Collector Jitendra Dudi) यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, जिल्ह्यातील नवमतदार नोंदणी अभियानाला मुदतवाढ दिली असून, त्यामुळे नवमतदारांनी २२ जानेवारीपर्यंत आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नवमतदार नोंदणीस मुदतवाढ दिल्याबद्दलची माहिती देण्यासाठी श्री. डुडी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे. गतवेळच्या गडचिरोली जिल्ह्याचे रेकॉर्ड साताऱ्याला मोडायचा आहे, असा संकल्प आम्ही केला आहे. नवमतदार नोंदणी जास्तीतजास्त करण्यात यावी, यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ज्यांचा जन्म २००४-०५ ला झालेला आहे, अशा सर्वांची यादी काढण्याचे आदेश दिले आहेत.

त्यांची नोंदणी कशी करता येईल, याची विशेष सूचना तलाठी, ग्रामसेवक यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर २०१९ पासून जे लोक मृत आहेत. त्यांचीही यादी तयार केली असून, त्यांची नावे वगळली जाणार आहेत. २०१९ ला एक लाख ४० हजार नवमतदार नोंदणी झाली होती. आता तीन लाख झाले आहेत. तर मयत, स्थलांतरित, दुबार मतदार यांची सुमारे दीड लाख नोंदणी कमी करण्यात आली आहे. जास्तीतजास्त मतदान कसे होईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न असून, गतनिवडणुकीत गडचिरोलीने सर्वांत जास्त मतदान करत प्रथम क्रमांक पटकावला होता.’’

यावेळी सातारा जिल्ह्याचा पहिला क्रमांक येण्यासाठी १०० टक्के मतदान करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाबळेश्वरच्या अतिक्रमणावरील कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘दोन दिवस थांबा पुन्हा कारवाई सुरू होईल, तसेच नवीन अतिक्रमण होणार नाही, याची आम्ही दक्षता घेत आहोत.’’

सध्यातरी पाणी टंचाई नाही..

दुष्काळाच्या अनुषंगाने विचारले असता श्री. डुडी म्हणाले, ‘‘पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. सध्या कोणतीही टंचाई नसून ज्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. ते पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. चारा डेपोचे दोन प्रस्ताव पाठवले असून, जेथे गरज आहे तेथीलच प्रस्ताव दिले आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.

वाहतूक समस्येत जिल्हाधिकारी लक्ष घालणार

सातारा शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासोबत संयुक्त पाहणी केली जाईल. तसेच एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही २९ डिसेंबरला बैठक घेणार आहोत. त्यातून वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाईल, असे डुडी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT