सातारा

खातगुण ग्रामपंचायतीने अपहार केला ?

सलीम आत्तार

पुसेगाव : कालबाह्य शिक्‍क्‍यांचा गैरवापर करून खातगुण ग्रामपंचायतीच्या महसुलामध्ये अपहार झाला आहे किंवा नाही याची चौकशी करण्याचे, तसेच ग्रामनिधीचा अपहार झाल्यास शासन नियमानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून खटाव गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी अपहाराबाबतची तक्रार दाखल केली होती.
आता भात लावणी करायची तरी कशी?
 
कालबाह्य शिक्‍क्‍यांचा वापर करून खातगुण ग्रामपंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांकडून संगनमताने ग्रामनिधीचा अपहार होत आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य गजानन लावंड, आनंदराव लावंड, विजय मुळे, मीनाक्षी गुजर, रेश्‍मा भोसले यांनी तक्रार दाखल केली होती. ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुसेगाव पोलिस ठाण्यातही तक्रारीच्या प्रती पाठविण्यात आल्या होत्या.
 
वापरलेले पावती पुस्तक, घेतलेला कोरोना दंड रक्कम, नळजोड अनामत रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केली नसल्याचे ग्रामसेवकांनी लेखी दिल्याने या प्रकरणाबाबत गूढ वाढले आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने खातगुणमध्ये खळबळ उडाली आहे. 

संपादन - संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT