Electricity Bill  
सातारा

लॉकडाऊननंतर उद्योजकांना वाढीव वीजबिलांचा शॉक!

उमेश बांबरे

सातारा  : कोरोनाच्या लॉकडाऊनने उद्योग, व्यवसायाचे कंबरडे मोडलेले असून आता कुठे गाडी रुळावर येत असताना बंद काळातील वीज बिले दुप्पट, चौपट वाढवून वीज वितरणने या ग्राहकांना शॉक दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या या व्यावसायिकांना दिलासा कोण देणार, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

सातारा जिल्ह्यात अडीच हजार मध्यम व लघुउद्योग आहेत. यापैकी 850 व्यावसायिकांकडे उच्च दाब वाहिनीचे वीज कनेक्‍शन आहेत. "कोरोना'च्या बंदमध्ये सर्व व्यवसाय व उद्योग बंद होते. त्यामुळे हे व्यावसायिक आणि उद्योजक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यांना कामगार पगार, कच्च्या मालासह इतर खर्च भागवावा लागत आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने वाढीव दराने वीजबिले देऊन या व्यावसायिकांना "शॉक'च दिला आहे. 

 वीज नियामक आयोगाने महावितरण कंपनीस एक एप्रिलपासून औद्योगिक, व्यावसायिक आदी सर्व उच्च दाब ग्राहकांचे बिलिंग केव्हीएच युनिटस्‌ आधारे करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार कंपनीने सर्व उच्चदाब वीज ग्राहकांना केव्हीएच युनिटस आधारे बिले पाठविली असून, नेहमीच्या वीजवापराच्या तुलनेने ही बिले दीडपट, दुप्पट ते पाचपट आकारणी होऊन आली आहेत. काही ग्राहकांना तर ही आकारणी दहा पट, 20 पट आहे.

वीज वितरण कंपनीच्या स्थापनेपासून सर्व ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापर म्हणजे केडब्ल्यूएच युनिटस्‌प्रमाणे वीजबिलांची आकारणी केली जात होती, तरीही वीजदरात वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून उद्योग, व्यावसायिकांच्या विजेचा दर कमी करावा, इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे विजेचा दर ठेवावा, अशी मागणी करत होते; पण त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. आता कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने कोणताही इन्कम झालेला नाही. उलट या बंदच्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळातील कामगारांचा पगार, कच्चा माल, इतर खर्च करावा लागला आहे. 

या खर्चात भर म्हणून, की काय वीज वितरण कंपनीने यावेळेस केव्हीएएच युनिटस्‌प्रमाणे बिलिंग सुरू केले आहे. लॉकडाउनच्या काळात उद्योग बंद होते. त्यामुळे योग्य काळजी घेणे, कपॅसिटर्स बंद ठेवणे आदी बाबी अशक्‍य होत्या, तसेच आजही योग्य तांत्रिक पूर्तता करणे उद्योग, व्यावसायिकांना शक्‍य नाही. त्यामुळे प्रत्यक्ष विजेचा वापर अत्यल्प असतानाही नेहमीच्या दुप्पट, पाचपट, दहापट बिले आल्यामुळे उच्च दाब ग्राहक हैराण झाले आहेत. अनेक ग्राहकांच्या बिलांमध्ये आयोगाच्या आदेशापेक्षाही केव्हीएएच युनिटसची कितीतरी पटीने जादा आकारणी झाली आहे. ही वारेमाप वीजबिले पाहून अनेकांपुढे उद्योग व्यवसाय पुढे सुरू ठेवायचा की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

औद्योगिक संघटनांचा आग्रह 
यातून मार्ग काढण्यासाठी व सध्याच्या काळात व्यावसायिक व उद्योजकांना दिलासा देण्यासाठी वीज वितरण कंपनीने कोरोनाच्या बंदच्या काळातील बिलिंगमधला सर्व बदल तात्पुरता, सहा महिने कालावधीसाठी रद्द करावा, मार्च 2020 पासून लॉकडाउन कालावधीतील स्थिर आकार व मागणी आकार पूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी सर्व औद्योगिक संघटनांनी वीज वितरण कंपनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

SCROLL FOR NEXT