Sweet Potato Crop Karve Goleshwar Satara esakal
सातारा

Satara Farmers : रताळे पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर; किडीचा प्रादुर्भाव, उत्पादनात निम्म्याहून अधिक घट

सध्या काढणी सुरू असलेल्या रताळ्याच्या (Sweet Potatoes) पिकाला किडीचे ग्रहण लागले आहे.

अमोल जाधव

सध्या कार्वे, गोळेश्वर येथील शिवारात रताळे काढणीची लगबग सुरू आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना निम्मेसुद्धा उत्पादन हाती लागले नाही.

शेणोली : सध्या काढणी सुरू असलेल्या रताळ्याच्या (Sweet Potatoes) पिकाला किडीचे ग्रहण लागले आहे. कमी पाऊसमान व जमिनीत गारवा नसल्यामुळे रताळ्यास किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट येत असल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भागवता आलेला नाही, अशी अवस्था आहे.

अनेकांनी पीक काढणी करण्यापेक्षा त्यावर अक्षरशः नांगर फिरवला आहे. कार्वे, गोळेश्वर येथील शेतीमध्ये रताळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पिकाचा हंगाम कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे शेतकरी बघतात. उत्पादित मालाला प्रती टन २२ ते २४ हजारांपर्यंत दर मिळाल्यास या पिकाचे अर्थशास्त्र जुळते.

डिसेंबर ते फेब्रुवारीअखेर काढणी असलेले क्षेत्र जादा राहते. याच कालावधीत बाजारपेठेमध्ये दरात चढ - उतार राहिल्याने शेतकरी चिंतेत असतात. गतवर्षी या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले. याउलट यंदा शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसला आहे. कमी पावसामुळे जमिनीत अपेक्षित गारठा उरलेला नाही. परिणामी, जमिनीखालील रताळे फळांच्या वाढीस फटका बसला. तोच फळे किडल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

सध्या कार्वे, गोळेश्वर येथील शिवारात रताळे काढणीची लगबग सुरू आहे. किडीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांना निम्मेसुद्धा उत्पादन हाती लागले नाही. काहींच्या संपूर्ण शेतातील पिकास कीड असल्याने त्या शेतकऱ्यांनी पीक काढणी करण्याऐवजी शेताची पिकासह नांगरणी केली आहे.

या संकटात शेतकऱ्यांवर उत्पादन खर्च बसला आहे. ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले त्यांना कमी अधिक दराची झळ बसत आहे. गेल्या आठवड्यापासून प्रतिकिलो २२ ते २३ रुपये दर मिळत आहे. त्याआधी हा दर कमी होता. निसर्ग आणि दराच्या लहरीपणामुळे रताळे उत्पादक शेतकरी यंदा तोट्यात आहेत.

तीन एकर क्षेत्रातील रताळे किडल्यामुळे पीक काढणी करणे उपयुक्त नव्हते. काढणी व मजुरी खर्च करण्यापेक्षा आम्ही पूर्ण पीकच शेतात हिरवळीचे खत म्हणून जमिनीखाली गाढले.

-हिंदूराव माने, गोळेश्वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files ओपन! सेक्स स्कँडलचे धक्कादायक 68 नवीन फोटो प्रसिद्ध... बिल गेट्ससह दिग्गज नेत्यांचे फोटो, जग हादरलं!

Kolhapur Double Killed Hupari : धक्कादायक! हुपरीत काळजाला चटका लावणारी घटना; मुलानेच वृद्ध आई-वडिलांचा केला निर्घृण खून

Kolhapur Election : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी; नेत्यांपेक्षा मतदारांना वश करण्यासाठी स्पर्धा; कार्यकर्त्यांची ताकदच विजयाला पडते उपयोगी

Ahilyanagar Crime: रुईछत्तीशी येथे हॉटेलमधून बांगलादेशी तरुणी ताब्यात; मुंबई पोलिसांची अहिल्यानगरमध्ये कारवाई, धक्कादायक माहिती समाेर..

'...तर कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांना होणार सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास', काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय; श्वसन विकारांचा धोका वाढल्यामुळे सतर्क

SCROLL FOR NEXT