सातारा

सरकारविरोधात पाटणमध्ये 'बोंबाबोंब'; शेतकरी आक्रमक

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांच्या निषेधार्थ पाटण तहसील कार्यालयाच्या पायरीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ठिय्या देऊन बोंबाबोंब आंदोलन केले. दरम्यान, तालुक्‍यात केवळ मंत्री आणि प्रांताधिकारी यांच्या सतत होणाऱ्या आढावा बैठकांतून शेतकऱ्यांच्या हिताचे काहीतरी साध्य करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी केले. 

शेतकऱ्यांबरोबर बॅंक अधिकाऱ्यांची बैठक लावण्याचे आश्वासन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिले होते. मात्र, ही बैठक न लावून प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. येत्या दोन दिवसांत यावर ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नाही तर याचे गंभीर परिणाम बॅंका आणि प्रशासनाला भोगावे लागतील, असा इशारा पाटणकर यांनी प्रशासनाला दिला. या वेळी जगन्नाथ पाटील, नंदकुमार आरेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड व पशुधन किसान क्रेडिट कार्ड या योजना सुरू केलेल्या असताना काही राष्ट्रीय बॅंका व जिल्हा बॅंका शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ व समज घेऊन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करत आहेत. यासंदर्भात बॅंकांच्या अधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांची बैठक लावण्याचे आश्वासन प्रातांधिकारी यांनी दिले होते. मात्र, ही बैठक न लावता प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून एक प्रकारे चेष्टा केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्‍यात पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा तोंडचा घास या पावसाने हिरावला आहे. या संदर्भात शासनाच्या कृषी विभाग अथवा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कोणतेच धोरण दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT