सातारा

बोगस बियाणांमुळे पाटणात भात शेतीचे मोठे नुकसान; कंपन्यांवर कारवाईची मागणी

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले असताना दुसरीकडे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने आता काय करायचे? असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडलेला आहे. शिवाय पेरणीचा वेळ निघून गेली आहे. या बोगस बियाणामुळे नुकसान झालेले भात उत्पादक शेतकरी पूर्ण हताश झाल्याचे चित्र पाटण तालुक्‍यात दिसत आहे. 

एकीकडे शेतकऱ्यांना कोरोनामुळे फटका बसलेला आहे. त्यातच आता या बोगस बियाणांची भर पडलेली आहे. इतकी मेहनत घेऊनही बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होईलही; पण या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचे काय? या पार्श्‍वभूमीवर बोगस बियाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

तालुक्‍यामध्ये अतिवृष्टीने शेकडो हेक्‍टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने पिके कुजली आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या उडीद, मूग, सोयाबीन, भात पिकांचे पंचनामे करण्याचे काम शासनामार्फत करण्यात आले. मात्र, ऐन काढणीच्या कामात पावसाने पुन्हा पिकांचे नुकसान केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला गेला आहे. अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या कामास मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT