सातारा

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा आंतरपिके घेण्याकडे कल; बटाटा, कांदा, वाटाण्याला सर्वाधिक पसंती

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : दिवसेंदिवस नगदी पिकांचा वाढता खर्च आणि लहरी हवामानामुळे पिकांच्या कमी निघणाऱ्या उत्पादनामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना नगदी पीक परवडत नाही. त्यावर उपाय म्हणून खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांचा आंतरपिके घेण्याकडे कल वाढला असून त्यातून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. 

दरम्यान, यंदा पडलेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने या भागातील मोळ, डिस्कळ, ललगुण, बुध, नेर, पुसेगाव, विसापूर, खातगुण परिसरातील शेतकऱ्यांचा उसासारख्या पिकांमध्ये नगदी बटाटा, कांदा यासारखी आंतरपिके घेण्याकडे कल आहे. या आंतरपिकांमुळे कमी क्षेत्रात जास्तीत जास्त पिकांचे उत्पादन घेतले जात असल्याने ते फायदेशीर ठरत आहे. नेर (ता. खटाव) येथील प्रगतशील शेतकरी हणमंत पवार यांनी ऊस पिकात बटाट्याचे आंतरपीक घेतले आहे, तर काही शेतकऱ्यांनी उसात कांदा, वाटाण्याची टोकण पद्धतीने लागवड केली आहे.

मिश्र पिकांमुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पूर्ण पीक उद्‌ध्वस्त न होता किमान एका पिकाचे तरी उत्पन्न हाती लागते. वेगवेगळ्या कुटुंबातील पिकांची लागवड आंतरपीक पद्धतीने होत असल्यामुळे आपोआपच त्याच्याशी संलग्न असलेल्या तणांचा तसेच, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. सलग एकाच पिकाखाली शेती न ठेवता मुख्य पिकांमध्ये आंतर किंवा मिश्रपीक पद्धती अंमलात आणल्यास निव्वळ आर्थिक फायदा जास्त मिळाल्याचे अनेक संशोधनपर प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे नगदी पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आंतरपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो.

उसात हंगामनिहाय विविध आंतरपिके घेतल्याने उसाचा खर्च चांगल्या प्रकारे कमी करून वर्षभर उत्पन्न उपलब्ध राहते. या आंतरपिकांमुळे तणांचे प्रमाण कमी होत आहे. कमी क्षेत्रात एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होताना दिसते. 
-हणमंत पवार, प्रगतशील शेतकरी, नेर 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT