Leopard esakal
सातारा

कऱ्हाडात मृतावस्थेत आढळला बिबट्या; वन विभाग घटनास्थळी दाखल

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : बेलवडे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील शिवारात मृतावस्थेतील बिबट्या (Leopard) शेतकऱ्यांना आढळून आला. त्याची माहिती वन विभागाला (Forest Department) देण्यात आल्यावर तात्काळ वन अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेलवडे बुद्रुक येथील तेलक नावाच्या शिवारात आज सकाळी उसाच्या शेतात चारा आणायला गेलेल्या शिवाजी बाळासाहेब पवार या शेतकऱ्याला परिसरातून दुर्गंधीचा वास आला.

बेलवडे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील शिवारात मृतावस्थेतील बिबट्या शेतकऱ्यांना आढळून आला.

त्यानंतर त्यांनी त्याठिकाणी पाहिले असता, त्यांना बिबट्या शेतात पडला असल्याचा दिसला. त्यावेळी ते थोडे घाबरले. त्यांनी तात्काळ त्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर काही वेळातच बिबट्याला पाहण्यासाठी शिवारात लोकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, वन विभागाला त्याची माहिती दिल्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या माहितीनुसीर, बिबट्याचा मृत्यू हा दोन दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT