satara sakal
सातारा

व्याघ्र प्रकल्पाच्या आडमुठेपणा विरोधात कोयनानगरात उपोषण

कोयनानगर येथील वन्यजीव कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

विजय लाड

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमीनीच्या मोबदल्यात तेथून जवळ मिळालेले जमीन क्षेत्र बहुचर्चित सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अडकली असून त्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मंजुरी मिळून सुध्दा वन्यजीव खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक त्यासाठी विलंब लावत असल्याने मूत्रपिंड निकामी झालेले हुंबरळी येथील बाधित देसाई (Desai) कुटुंबीयांनी या विरोधात गुरुवार पासून कोयनानगर येथील वन्यजीव कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत रमेश देसाई व आनंद देसाई यांनी प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात २३ बाधित खातेदारांच्या जमिनी कोयना प्रकल्पात संपादित झाल्या होत्या.यावर बाधित खातेदारांना मूळ जमिनी जवळच कब्जेपट्टी करून जमिनी दिल्या होत्या.याच जमिनी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या कोअरझोन मध्ये सापडल्या आहेत.२० एकराचे हे क्षेत्राचा यात समावेश असल्याने वहिवाट पूर्णपणे ठप्प झाले आहे.

२० एकराच्या मोबदल्यात शासन निर्णयानुसार रोख रक्कमेचा प्रस्तावजिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मंजूर करून खातेदारांना जवळपाससव्वादोन कोटीची रक्कम देण्याचे मान्य केले असले तरी वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने यात चालढकल केल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला आहे.देसाई कुटुंबातील रमेश देसाई हे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्रस्त आहेत.त्यांच्या कुटुंबाला उपचारांचा खर्च न पैलवणारा आहे.

वन्यजीव विभाग आपल्या न्याय मागणीला केराची टोपली दाखवत असल्याने त्यांनी अन्याया होत असल्याच्या भावनेतून देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र लिहून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आपल्या न्याय मागणीसाठी बाधित देसाई कुटुंबीय कोयनानगर येथील वन्यजीव कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT