Ankush and Aditya Salunkhe
Ankush and Aditya Salunkhe sakal
सातारा

डंपर-दुचाकीच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू; दोघांचेही शीर धडावेगळे

सकाळ वृत्तसेवा

बेदरकार भरधाव डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची येथील पिता-पुत्र जागीच ठार झाले. त्यात पत्नी गंभीर जखमी आहे.

आष्टा - बेदरकार भरधाव डंपरने (Dumper) मोटारसायकलला (Motorcycle) दिलेल्या धडकेत (Accident) कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची येथील पिता-पुत्र (Father-Son) जागीच ठार (Death) झाले. त्यात पत्नी (Wife) गंभीर जखमी (Injured) आहे. भयानक अपघातात पिता-पुत्रांची डोकी धडावेगळी झाली होती. अंकुश शिवाजी साळुंखे (वय ४०), आदित्य अंकुश साळुंखे (१४) अशी पिता-पुत्रांची नावे आहेत. सोनाली अंकुश साळुंखे (३४) असे जखमी आईचे नाव आहे. आष्टा ते इस्लामपूर रस्त्यावर आज सकाळी ९ वाजता आहीरवाडी फाट्याच्या वळणावर अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हजामाचीचे अंकुश, त्यांची पत्नी सोनाली, मुलगा आदित्य यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच 50- आर1676 ) आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते. आहीरवाडी फाटा वळणावर आले असता इस्लामपूरकडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव डंपरने साइड बदलून दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की धडकेत अंकुश व आदित्य दोघे जागीच ठार झाले. अंकुश यांची पत्नी सोनाली गंभीर जखमी झाल्या.

डंपर चालकाने बेदरकापणे डंपर न थांबवता आष्ट्याच्या दिशेने पळविला. घटनास्थळी गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही शीर धडावेगळे झाल्याने तेथील चित्र भयावह होते. रक्ताच्या थारोळ्यात दुचाकी व मृतदेह होते. दोघांच्याही डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. रुग्णवाहिका चालक साजन अवघडे, ओंकार डांगे यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवले. घटनास्थळ रक्तरंजित झाले होते. पोलिस निरीक्षक अजित सिद्ध, सहायक पोलिस निरीक्षक मनमित राऊत यांनी घटनास्थळी भेट देवून मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT