Leopard
Leopard Sakal
सातारा

बिबट्याच्‍या भीतीने जिल्‍हाधिकारी कार्यालय आवारात बसविले ट्रॅप कॅमेरे

गिरीश चव्हाण

सातारा - जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या (Collector Office) आवारात आलेल्‍या बिबट्याचा (Leopard) शोध घेण्‍यासाठी दुसऱ्या दिवशी वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्‍यांना बिबट्याचा मागमूस लागला नाही. बिबट्याच्‍या हालचाली आढळलेल्‍या परिसरात वनविभागाने नाईट व्हीजन ट्रॅप कॅमेरे (Trap Camera) बसविले असून, त्‍या परिसरात आढळलेल्‍या ठशांची तपासणी करण्‍याचे काम सुरू आहे.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारालगत असणाऱ्या दाट झाडीत बिबट्यासदृश प्राणी असल्‍याचे काल रात्री त्‍याठिकाणच्‍या सुरक्षारक्षकाच्‍या निदर्शनास आले. यानंतर त्‍याने ही माहिती वरिष्‍ठांना दिली. माहिती मिळताच वरिष्‍ठांनी वनविभागास कळवत उपाययोजना राबविण्‍याच्‍या सूचना केल्‍या. यानुसार वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्री संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा माग काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यात यश आले नाही. आज सकाळी सहा ते सकाळी दहापर्यंत पुन्‍हा परिसरात शोध मोहीम राबविण्‍यात आली. यातही बिबट्याच्‍या अस्तित्वाच्या, वावर असल्‍याच्‍या ठोस खाणाखुणा वनविभागाच्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाल्‍या नाहीत. परिसरातील शोधादरम्‍यान आढळलेल्‍या ठशांची पडताळणी सुरू असून, या परिसरातील दाट झाडीत वनविभागाने नाईट व्हीजन ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत.

सध्‍यातरी बिबट्याचे अस्तित्व, वावर असल्‍याचे समोर आले नसून त्‍याबाबत शोध सुरू आहे. नागरिकांनी असा प्रकारचा कोणताही वन्‍यप्राणी आपल्‍या परिसरात आढळल्‍यास त्‍याची माहिती तत्काळ वनविभागास देण्‍याचे आवाहन वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्‍हाण यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT