सातारा

कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांतही कंपोस्ट खतनिर्मिती; कऱ्हाड पालिकेचा स्तुत्य उपक्रम

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील जवळपास 800 हून अधिक घरांत कंपोस्ट खत केले जात आहे. कऱ्हाड पालिकेचा कंपोस्ट खत पॅटर्न शहरातील विविध कॉम्प्लेक्‍स अन्‌ कॉलन्यांमध्ये सामुदायिकारित्या राबविला जाणार आहे. त्या कॉम्प्लेक्‍ससह कॉलन्यांमधील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी 100 हून अधिक कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांत पालिका प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे कुटुंबांसह शहरातील कॉम्प्लेक्‍स, कॉलन्या कचरा निर्मूलनात अग्रेसर राहणार आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या आहेत. 

पालिकेने घरी निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर घरातच प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट खताची कल्पना पुढे आणली. शनिवार, रविवार, मंगळवार, गुरुवार पेठांसह वाखाण भाग, मार्केट यार्ड, कोल्हापूर नाका येथील जवळपास 800 कुटुंबे खत तयार करत आहेत. पालिकेने त्यासाठी डबे व कल्चर वाटले आहेत. त्यामुळे कंपोस्ट खताचा कऱ्हाड पॅटर्न तयार झाला. ही योजना यशस्वी झाल्याने पालिकेने कॉम्प्लेक्‍स अन्‌ कॉलन्यांना "टार्गेट' केले आहे. त्यासाठी पालिकेने 100 हून अधिक कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांची यादी केली आहे. तेथील सामुदायिक व सार्वजनिक कचरा विघटनाचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने 100 लिटरचे वेगळ्या डिझाइनचे डबे तयार केले आहेत. ते कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांत दिले जाणार आहेत. त्या परिसरात बाहेर रस्त्यावर टाकला जणारा कचरा त्यात साठवून त्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाणार आहे. त्या योजनेसाठी पालिकाही त्या कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांसोबत सक्रिय असणार आहे. त्यात निवड झालेल्या कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांत पालिका कर्मचारी खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक, मार्गदर्शन करणार आहेत. 

 मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्प्लेक्‍स, कॉलन्यांबाहेर पडणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र 100 लिटरचे डबे तयार करून 100 हून अधिक कॉलन्या, कॉम्प्लेक्‍समध्ये वाटले जाणार आहेत. टाकाऊ अन्न, झाडांचा पाला, पाचोळा या डब्यांत साठवून त्यावर प्रक्रिया होऊन खतनिर्मिती केली जाणार आहे. 
-आर. डी. भालदार, अभियंता, आरोग्य विभाग 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT