Ajit Pawar esakal
सातारा

Ajit Pawar : 'पन्नास खोके’ जनतेपर्यंत पोचले; अजित पवारांचा शंभुराज देसाईंना खोचक टोला

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी, (जि.सातारा) : ‘बारक्या शेंबड्या पोरालाही आता पन्नास खोके- एकदम ओके कळायला लागले आहे. तुमच्या येथे तर सायरन वाजू लागला की लोकं म्हणतात ते बघा पन्नास खोकेवाला चाललाय, बैलपोळ्याला बैलाच्या अंगावरही ‘पन्नास खोके- एकदम ओके’ लिहले जातेयं. हे आम्ही सांगितले नव्हते, लोकांपर्यंतच ते पोचलेय’, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज लगावला.

पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज गुढे फाटा (ता.पाटण) येथील श्री गणेश मंगल कार्यालयात झाला. मेळाव्यात अजित पवार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता भाषणात अप्रत्यक्षपणे अनेक टोले लगावले.

ते म्हणाले, ‘‘हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय व आधार देण्यासाठी शिवसेना उभी केली,वाढविली. साधे कार्यकर्ते मोठे केले. मात्र जे त्यांच्या जिवावर मोठे झाले, त्यांनीच त्यांच्या मुलाकडील शिवसेना काढून घेतली, असा काय चमत्कार तिथे झाला की आमदार, खासदारांना जावे लागले. अशी गद्दारी फार काळ चालत नाही.

कर्नाटकात जे गेले त्यांना जनतेने पराभूत केले आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्या पद्धतीने जागा वाटप होईल त्या पद्धतीने तुम्हाला इमाने इतबारे काम करावेच लागेल, ’’ अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; सुप्रीम कोर्टाकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

Team India: सुट्टी नाहीच! फक्त विराट-रोहितच नाही, तर सर्वच भारतीय खेळाडूंना BCCI ची चपराक; ते सामने खेळा, तरच...

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

SCROLL FOR NEXT