सातारा

मारहाणीतील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; आटकेत तणाव

सचिन शिंदे

कऱ्हाड : अनैतिक संबंधाच्या कारणावरून युवकाला बेदम मारहाण केलेल्या जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजय विठ्ठल दुपटे (वय 30, रा. आटके) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, संशयितास तातडीने अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
 
याबाबत नागेश विठ्ठल दुपटे याने कऱ्हाड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. सचिन लक्ष्मण दुपटे (रा. आटके) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांची माहिती अशी : आटकेतील अजय दुपटे हा जेसीबीवर चालक म्हणून काम करीत होता. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून सचिन हा त्याच्याशी वाद घालत होता. वर्षभरापूर्वी याच कारणावरून सचिनने कऱ्हाड शहर पोलिसांत अजयविरोधात तक्रार दिली होती.

काही दिवसांपूर्वी अजयने संबंधित महिलेस फोन करून "तू सासरी जा, आपण सर्व प्रकरण मिटवू,' असे सांगितले होते. दरम्यान, "अजयला समजावून सांगा नाही तर मी त्याचे हातपाय मोडीन,' अशी धमकी सचिन वारंवार नागेशला देत होता. गुरुवारी (ता. 18) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अजय हा शेणोली येथे जेसीबीवर मजुरीसाठी निघाला असताना सचिनने लाकडी दांडक्‍याने त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी नागेश घरातच होता. माहिती मिळाल्यानंतर नागेश हा धावत त्याठिकाणी गेला असता नाईकबा मंदिरासमोर अजय हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याला दिसले. त्यावेळी सचिनला त्याचे आई, वडील ओढत घराकडे नेत होते. नागेशसह नातेवाईकांनी जखमी अजयला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिसांत झाली आहे. 

विनामास्क फिरणा-या व्यापाऱ्यांना तांबवेत ठोठावला चार हजार दंड

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारात डोनाल्ड ट्रम्प यांचाच खोडा, लीक ऑडियो क्लिपमध्ये धक्कादायक खुलासा

Chandra Shani Yog 2026: धक्का देणारा ग्रहयोग! 27 जानेवारीला चंद्र–शनी दृष्टीमुळे वृषभसह ‘या’ 2 राशींची परीक्षा

Pune News : पत्नी उच्चशिक्षित, नोकरी करतेय; कोर्टाने पोटगीचा दावा फेटाळला, तिचे आरोप सामान्य कुरबुरींसारखे

Shubhanshu Shukla : अंतराळात तिरंगा फडकवणाऱ्या शुभांशु शुक्लांना अशोक चक्र; अंतराळ स्थानकाचा प्रवास करणारे इतिहासातले पहिले भारतीय

बिग बॉसच्या घरात आला Wild card सदस्य, दारातून येणारी ‘ती’ व्यक्ती कोण? चाहत्यांचा अंदाज खरा असेल?

SCROLL FOR NEXT