Bullock cart Sakal
सातारा

सातारा : बैलगाडी शर्यतींत हाणामारीचे प्रकार

न्यायालयाने घातलेल्या अटींचे काटेकोर पालन होण्याची मागणी

विलास माने

मल्हारपेठ - शासकीय नियमांची कागदोपत्री अंमलबजावणी करून सुरू असलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये गाडीमालक आणि समर्थकांत दंगा व हाणामारीचे प्रकार वाढत आहेत. अनेक शर्यतींमध्ये नंबरवरून दहशत माजवण्याच्या प्रकारामुळे न्यायालयाने घातलेल्या अटींचे काटेकोर पालन होण्याची मागणी होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडी शर्यतीचा निर्णय होत नव्हता. मात्र, अनेक याचिकाकर्ते, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेक वेळा आवाज उठवून बैलगाडी शर्यत सुरू करण्यास शासनास भाग पाडले. शर्यत बंदीचा निर्णय उठवला आणि राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या शर्यती शांततेत पार पडल्या. मात्र, पाटण तालुक्यातील शेडगेवाडी, नाटोशी, लुगडेवाडी, आडुळ, पाटण (काळोली), माथणेवाडी, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे या गावांत भांडणे, वादावादी झाली. प्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप करून गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, कऱ्हाड तालुक्यतील ओगलेवाडी, उंब्रज, वहागाव, रेठरे या ठिकाणच्या शर्यती पारदर्शक झाल्या. मोठ्या एलईडी स्क्रिनवर शर्यतींचे निकाल देण्यात आले. त्यामुळे मैदान शांततेत पार पडले.

दरम्यान, काही ठिकाणी गाडी मालकांच्यात हाणामारीचे प्रकार घडलेल्या ठिकाणी शर्यतीचे निकालही झाले नाहीत. त्यामुळेच वादावादी आणि भांडणाचे प्रकार घडले. या शर्यती सुरू राहाव्यात असे वाटत असेल तर बैलगाडी मालकांस शासकीय परवाने दिल्याशिवाय शर्यतीमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, असा पवित्रा अनेक गावांतील संयोजन समितीने घेतला आहे. शर्यतीत पाहुण्यांच्या नावाखाली गाडी नोंदवण्यामुळे संयोजक आणि गावकऱ्यांतही वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यासाठी गाडी मालकांना शासकीय परवाने बंधनकारक करण्याची मागणी अनेक शर्यतप्रेमींतून होत आहे.

गाडी मालकांत शर्यतीवेळी होत असलेली वादावादी, हाणामारी निंदनीय आहे. अशा प्रकारांमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार आहे. गाडी मालकांच्यात जर असे हाणामारीचे प्रकार घडून स्थानिक संयोजन समितीच्या निर्णयाची पायमल्ली होऊ लागली तर शर्यती होण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे शासनाने अशा शर्यतीत सहभागी होणाऱ्या गाडीमालकांना नियमावलीसह कायदेशीर बाबींचाही परवाना बंधनकारक करावा.

- विकास शेडगे, अध्यक्ष, शर्यत समिती, शेडगेवाडी-विहे.

बैलगाडी शर्यतीमध्ये घडणारे प्रकार घातक आहेत. बैलगाडी मालकांकडून असे प्रकार घडत असतील तर ते बरोबर नाही. अनुचित प्रकार घडला तर गुन्हे दाखल होणारच. संयोजन समितीने ठरलेले बक्षीस दिले पाहिजे. ते होत नाही. यापुढे शर्यती पुढे चालू राहाव्यात असे वाटत असेल तर असे प्रकार थांबले पाहिजेत.

- प्रकाश पवार, गाडीमालक, दाढोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT