Satara 
सातारा

दहावीच्या परीक्षेत "चारचॉंद' लावलेल्या मलिकाला आर्थिक मदत

राजेंद्र शिंदे

खटाव (जि. सातारा) : येथील एका गरीब भाजीविक्रेत्याच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबाबत दैनिक "सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत एका सहृदयी, दानशूर व्यावसायिकाने त्या मुलीला आर्थिक मदत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. 

येथील मलिका आरिफ काझी हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रामाणिक मेहनतीने 95.40 टक्के गुण मिळवले. घरची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती मलिकाच्या यशाआड आली नाही. एकट्या वडिलांच्या भाजीपालाविक्रीच्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मलिकाने मिळवलेल्या यशाला "सकाळ'ने "भाजीविक्रेत्याच्या कन्येने लावले चारचॉंद' या मथळ्याखाली प्रसिध्दी दिली होती.

या वृत्ताची खटावचे मुंबईस्थित उद्योजक संजय घाडगे यांनी दखल घेत गावी परतल्यावर लगेचच मलिका व तिच्या वडिलांना बोलावून मलिकाच्या हाती दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कोरोनाच्या बिकटप्रसंगी अनपेक्षित मिळालेल्या मदतीने मलिका, तिच्या वडिलांना गहिवरून आले. श्री. काझी यांनी श्री. घाडगे व "सकाळ'चे आभार मानले. 

मलिकासारख्या होतकरू मुलींना मदत करताना दान सत्पात्री गेल्याचे समाधान मिळत आहे. "सकाळ'मुळे या होतकरू मुलीपर्यंत मी पोचू शकलो. त्याबद्दल "सकाळ'चे आभार, असे मनोगत श्री. घाडगे यांनी व्यक्त केले. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे भाजीपालाविक्रीवर अवलंबून होता. त्यामुळे माझ्या निकालाचा आनंद जास्त काळ टिकू शकला नव्हता. मला माझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीची भ्रांत होती. तथापि, "सकाळ'मुळे संजूकाका माझ्या मदतीला अगदी ऐनवेळी धावून आल्याने "सकाळ'चे मी शतशः आभारी आहे, अशी प्रतिक्रिया मलिका हिने व्यक्त केली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT