सातारा

सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सुनेला शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कऱ्हाड ः कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह त्यांची मुलगा राजेश, मुलगी सौ. टिना महेश पाटील (रा. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याबाबत सौ. आदिती राजेश पाटील (सध्या. रा. कऱ्हाड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सौ. आदिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर येथील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुऴात खळबऴ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सौ. आदितीला शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद सौ. टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सौ. आदिती राजेश पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

आदिती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरे व आनंद यांनी संगनमत करुन विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशाप्रकारच्या विविध कलमान्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्हा केला कबूल, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Kolhapur Crime News : कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा! किरकोळ वादातून दोन निर्घृण खून, सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

Beed News: घरकुल घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; केज येथील ‘सकाळ’ने उघड केलेला सव्वाचार कोटींचे प्रकरण

Nashik Highway: नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली; वाहनचालकांसह प्रवासी संतापले, टोल भरूनही त्रास!

Kolhapur Girl End Life : कल्याणीला भिती नववी नापास होण्याची, कोणालाही न सांगता तिने जे केलं ते धक्कादायक; कोल्हापुरातील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT