First place award from VSI to Sahyadri factory
First place award from VSI to Sahyadri factory sakal
सातारा

‘सह्याद्रि’ कारखान्यास व्हीएसआयकडून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार!

हेमंत पवार

कऱ्हाड : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने जाहीर केला आहे.वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे सन 2019-20 सालाचे ऑडिटेड जमाखर्च पत्रकांची छाननी केली. त्यामध्ये सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे.(excellent financial management)

त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा प्रति यिवंटल साखरेस आलेला रोखीचा उत्पादन खर्च रूपये 366.30 इतका असून तो राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन खर्चापेक्षा मोठ्या फरकाने कमी आहे. त्याचबरोबर साखर उत्पादन प्रक्रियेचा खर्च 813.75 प्रति क्विंटल असून तो ही राज्याच्या सरासरी साखर उत्पादन प्रकियेचा एकूण खर्चापेक्षा कमी असल्याचे छाननीत दिसून आले. कारखान्याच्या नयत मुल्य,भांडवलाच्या पाया निर्देशांकात भरीव वाढ झाल्याचेही दिसून येत असल्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने नोंद घेतली आहे. यासह विविध निकषांच्या आधारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांनी कारखान्यास प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहिर केलेला आहे.(Vasantdada Sugar Institute)

कारखान्याचे अध्यक्ष आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नियोजनबद्द मार्गदर्शनाखाली, कारखान्याने केलेल्या काटकसरीच्या कारभारामुळे कारखान्यास यापूर्वीही चारवेळा देशपातळीवरील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचे पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह नवी दिल्ली या संस्थेकडून मिळाले आहेत. व्हीएसआयने यापूर्वीही 2015-16 या सालासाठी उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार देवून गौरविलेले आहे. कारखान्यास जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे अध्यक्ष, सहकारमंत्री पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT