ajay kumar bansal sakal
सातारा

सातारा जिल्ह्यातील पाच गुंड वर्षासाठी तडीपार; ‘एसपीं’चा आदेश

दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या टोळीतील चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार.

प्रवीण जाधव

दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या टोळीतील चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार.

सातारा - कोरेगाव तालुक्यातील वाठार, रहिमतपूर व खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, (Robbery) दरोड्याची तयारी, घरफोडीच्या गुन्ह्यात (Crime) सक्रिय असलेल्या टोळीतील (Gang) चौघांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार (Tadipaar) केले आहे. दरम्यान, दत्तात्रय दादासो मसुगडे यालाही चार तालुक्यांतून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

टोळीप्रमुख प्रदीप प्रकाश माने (वय २६, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव), अक्षय बाजीराव दोरके (वय २०, रा. वाठार स्टेशन), विजय बाळू जाधव (वय १९, रा. भाडळे, ता. कोरेगाव) व इर्शाद हारुण मुल्ला (वय ३६, रा. वाठार स्टेशन) अशी त्यांची नावे आहेत.

या तिघांवर कोरेगाव व खटाव तालुक्यांत दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी तसेच फळाचा गाडा उलटवून पेटवणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सुधारण्याचीही संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात सुधारणा झाली नाही. उलट त्यांच्याकडून दहशत व भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत वाठार पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर हद्दपार प्राधिकरणापुढे सुनावणी सुरू होती. त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, वाठार पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन जगताप यांनी आवश्यक पुरावे सादर केले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

गुंड दत्तात्रय मसुगडेही तडीपार

विसापूर : पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंड दत्तात्रय दादासो मसुगडे (वय २२) याला एक वर्षाकरिता जिल्ह्यातील चार तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. दत्तात्रय (रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) याच्याविरुद्ध दहिवडी व पुसेगाव पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर दाखल गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षा झालेली होती व तो तुरुंगात होता. नजीकच्या काळात जामिनावर सुटून येताच पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करून मसुगडेस माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT