satara Sakal
सातारा

मायणी दरोडाप्रकरणी पाच तपास पथके; पोलिस ॲक्शन मोडवर

मायणीसारख्या ग्रामीण भागात बंदूक रोखून ज्वेलरी लुटण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा

मायणी : येथील बालाजी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडाप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून, पाच पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आल्याचे पोलिस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी सांगितले.

मायणीसारख्या ग्रामीण भागात बंदूक रोखून ज्वेलरी लुटण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसही त्याबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत. परिसरातील नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत. सशस्त्र दरोडाप्रकरणी कोणत्याही परिस्थितीत संशयित गजाआड झाले पाहिजेत, असे आदेश पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिल्यामुळे पोलिस अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिस संयुक्तपणे घटनेचा तपास करीत आहेत.

त्यासाठी दहिवडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी पाच तपास पथके तयार केली आहेत. विटा (सांगली) ते दहिवडी पट्ट्यातील हॉटेल, ढाबे स्थानिक पथकाकडून पिंजून काढले जात आहेत. शेजारील सांगली जिल्ह्यातील विटा, आटपाडी परिसर, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, म्हसवड या भागांतही पथके रवाना करण्यात आली आहेत. आज दिवसभर पथके तपास करीत फिरत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या हाती काहीही ठोस लागलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT