Lonand Police Station esakal
सातारा

धक्कादायक! पोटच्या चिमुकल्याचा नाक, तोंड दाबून आईनंच केला खून

रमेश धायगुडे

चिमुकल्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून, उशीनं नाक-तोंड दाबून जन्मदात्या आईनंच खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

लोणंद (सातारा) : पाच महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून, उशीने नाक व तोंड दाबून जन्मदात्या आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना तरडगाव (ता. फलटण) येथे घडलीय. या घटनेनं इथं खळबळ उडालीय. मात्र, या घटनेचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून (Lonand Police Station) मिळालेली अधिक माहिती अशी, की तरडगाव येथील पांढरी येथील आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलिस ठाण्यात स्वतः फोन करून तिच्या पाच महिन्‍यांचा लहान मुलगा १२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता जिवे मारून पुरला आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा नाही तर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते. त्यावरून लोणंद पोलिसांनी तिच्याकडे जावून खात्री केली असता तिने तिचा पाच महिन्‍यांचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड यास ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक व तोंड दाबून जिवे मारून खून केल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यातील हवालदार विठ्ठल काळे यांनी फिर्याद दिली असून, या महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खूनप्रकरणी महिलेस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित आरती गायकवाड हिला फलटण येथील न्यायालयात (Phaltan Court) हजर केले असता तिला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वायकर व सहकाऱ्यांनी आज सरकारी पंचांसमवेत घटनास्थळाचा पंचनामा करून ज्या ठिकाणी चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता, त्या ठिकाणी खोदल्यावर बाळाचा मृतदेह मिळून आला. तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवर शवविच्छदन केले. दरम्यान, जन्मदात्या आईने हे कृत्य नेमक्या कोणत्या कारणामुळे केले, याचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT