सातारा

फ्लेमिंगोचे 'लॅंडींग' कधी होणार?; मायणीत दर्शनासाठी पक्षी निरीक्षक आतूर

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : फ्लेमिंगोंच्या दर्शनासाठी पक्षी निरीक्षक आतुर झाले आहेत. मात्र, ब्रिटिशकालीन मायणी तलाव व परिसरातील पाणवठ्यावर दिवाळीदरम्यान डेरेदाखल होणाऱ्या फ्लेमिंगोंचे आगमन अद्याप झालेले नाही. केवळ स्थानिक स्थलांतरीत पक्षांचाच किलकिलाट कानावर येत आहे. 

इंग्रज राजवटीतील मायणी तलाव फ्लेमिंगोसह अन्य परदेशी पाहुण्या पक्षांचे आश्रयस्थान म्हणून सर्वदुर प्रसिद्ध आहे. दिवाळीदरम्यान कडाक्‍याच्या थंडीत हे पाहुणे पक्षी येत असतात. यंदा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोसमी, अवकाळी व परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यंदा तलाव भरुन ओसंडून वाहिला आहे. पाणी मुबलक असल्याने यंदा फ्लेमिंगो हमखास डेरेदाखल होतील, अशी आशा पर्यटक व पक्षी निरीक्षकांना आहे. फ्लेमिंगो दाखल झाल्याने पर्यटक वाढून स्थानिक बाजार पेठेच्या उलाढालीवर परिणाम होत असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकही फ्लेमिंगोची आतुरतेने वाट पाहत आहेत. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील पक्षी निरीक्षक स्थानिक लोकांना संपर्क साधून फ्लेमिंगो आल्याची चौकशी करीत आहेत. मात्र, डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या फ्लेमिंगोंचे लॅंडिंग अद्याप तलाव परिसरात झालेले नाही. 

राज्य शासनाने नुकतेच वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मायणीसह परिसरातील कानकात्रे, सुर्याचीवाडी व येरळवाडी परिसर जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा येथे दाखल होणाऱ्या परदेशी पक्षांच्या निरीक्षण व दर्शनासाठी तलाव परिसरात प्रवेश मिळणार का? अशी शंका पक्षी निरीक्षक व व स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. फ्लेमिंगो कधी येणार? की स्थानिक पक्षी पाहून दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार, अशी प्रतिक्रिया निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षक व्यक्त करीत आहेत. लांबलेला पाऊस, कडाक्‍याची थंडी आणि उत्तर भारतात उशीराने सुरु झालेली बर्फवृष्टी आदी कारणांमुळे फ्लेमिंगो अद्याप दाखल झाले नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे स्थानिकांसह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांना अजून काही काळ फ्लेमिंगोंची प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

बगळे, बदके, चित्रबलाक, गरुड... 

परदेशी पक्षांऐवजी सध्या तलाव परिसरात विविध जातींचे बगळे, बदके, कापशी घार, गरुड, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी तसेच नदी सूर, खंड्या, कवड्या, राखी बगळा, वंचक, चित्रबलाक आदी स्थानिक स्थलांतरीत पक्षांचांच किलकिलाट ऐकायला मिळत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT