Food donation from youth every Wednesday in Pachgani satara sakal
सातारा

भुकेलेल्यांसाठी माणुसकीचे चार घास

पाचगणीत दर बुधवारी तरुणाईकडून अन्नदान; लॉकडाउनमध्येही उल्लेखनीय काम

सुनील कांबळे

पाचगणी : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून आठवडा बाजारासाठी दाखल होणारे विक्रेते, मोलमजुरी करणारे तसेच भुकेलेल्यांना ‘माणुसकीसाठी चार घास’ हे ब्रीद उराशी बाळगून येथील तरुणाईने हाती घेतलेल्या अन्नदानाच्या उपक्रमामुळे घरापासून दूर असणारांना एक वेळची ‘रोटी’ देऊन माणसातील माणुसकी जिवंत ठेवली आहे.दोन वर्षांपूर्वी मार्चपासून कोरोनाचे ढग अल्पवधीत गडद झाले आणि काही दिवसांतच मनुष्याची जगण्याची लढाई सुरू झाली. विविध दानशूर, सेवाभावी संस्था गरजूंच्या हाकेला धावून आल्या असतानाच देणारांच्या गर्दीत येथील आठ ते दहा तरुणांची फौज पुढे सरसावली.

मात्र, हे समाजकार्य पार पाडताना कुठल्याही प्रसिद्धीपासून स्वतःला अलिप्त ठेवायचे, याची खूणगाठ त्यांनी बांधली. शहरातील विविध भागांतील उपेक्षितांना गृहोपयोगी साहित्य घरपोच केले. काही महिन्यांपासून कोरोनाचे ढग विरळ झाले. मात्र, समाजसेवेचे व्रत यापुढेही खंडित पडू नये, याची खबरदारी घेत या तरुणाईने दर बुधवारी जिल्ह्यातून, बाहेर जिल्ह्यांतून बाजारपेठेत दाखल होणाऱ्या विक्रेत्यांसाठी अन्नदान करण्याची संकल्पना आखली. त्यानुसार आठवडा बाजारात शिवाजी चौकात दुपारी १२ वाजता खरेदी करण्यासाठी दाखल होणारे मजूर तसेच शहर व परिसरातून येणाऱ्या २५० ते ३०० गोरगरिबांना अन्नदान केले जाते. दर आठवड्याला मेनू वेगवेगळ्या प्रकारचा असतो.

ही तरुणाई जरी प्रसिद्धीपासून अलिप्त असली तरी अन्नदानाची संकल्पना ही आम्हाला मित्र इम्रान इनामदार यांच्याकडून मिळाली असल्याचे सांगतात. तरुणाईचा अन्नदानाचा उपक्रम स्तुत्य असल्याने अनेक जण सढळ हाताने मदतीसाठी पुढे सारसावू लागले आहेत.

अन्नदानाचा हा उपक्रम लॉकडाउनपूर्वी इम्रान इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ते दहा जणांनी सुरू केला. कोरोना काळात हा उपक्रम खंडित झाला असला तरी आम्ही त्या काळात गृहोपयोगी वस्तू वाटल्या.

- उपक्रम राबवणारे तरुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT