forced to submit tenders general contractors Karhad municipality satara sakal
सातारा

कऱ्हाडला सामान्य ठेकेदारांना निविदा भरण्यावरून दमदाटी

सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही टेंडर भरायचे नाही, अशी धमकी देत आहेत प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : येथील पालिकेची विविध कामाचे ई निवीदा भरणाऱ्या सामान्य ठेकेदारांना दमदाटी केली जात आहे.  त्या ई निवीदेत स्थळ पाहणीची अट सक्तीची आहे, तरीही पालिका अधिकारी स्थळ पहाणीला ठेकेदाराला वेळ व अहवालही देत नाहीत. त्या  उलट कोणत्या ठकेदाराने कोणता ठका भरला आहे,  त्याची माहिती पालिकेतील मतलबी लोकांना दिली जाते. तीच लोक सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही टेंडर भरायचे नाही, अशी धमकी देत ठेकेदारावर दबाव आणत आहेत. त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

राजाराम गणपत शिदे, दिपक शांताराम पवार व दिनकर लक्ष्मण पाटील व अन्य ठेकेदारांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथील पालिकेने विविध कामांच्या शासनाने ई निवदा काढल्या आहेत. संबंधित ठेकेदारांना तुलनात्मक निविदा भरता यावी. हा उद्देश आहे. मात्र निविदा भरतांना धन दाडग्यांचा दबाव येऊ नये. व वू गप्प बसावे लागते. येथील पालिकेच्या बांधकाम व जलःनिस्सारण विभागाकडून कामाची ई निविदा प्रसिध्द झाली आहे. त्यात निविदा भरणेपुर्वी संबंधीत ठेकेदाराने पालिका प्रतिनिधींसह कामाची स्थळ पाहणी करून तसा दाखला पालिकेकडून घेण्याचा आहे. मात्र ती अट नसून मेख आहे. त्यामुळे ठेकेदार स्थळ पाहणीला संबंधित आधिकाऱ्याची विनवनी करत आहेत. तरिही अधिकारी टाळाटाळ करतात.

त्याउलट निविदा भरायला आलेल्या ठेकेदारांची माहिती पालिकेतील काही मतलबी लोकांना ते देतात. ते मतलबी सामान्य ठेकेदाराला बोलावून तुम्ही हे कामाची निविदा भरावयाची नाही. ते काम दुसऱ्याला दिले आहे असा दबाव ठेकेदारावर आणत आहेत. त्यामुळे पालिका बदनाम होत आहे. पालिकेचे मुख्याधिकारीही बदनाम होत आहेत. नवीन ठेकेदारांना किंवा तुलनात्मक दर भरू इच्छिणाऱ्यांवरही अन्याय होत आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ई निविदात अशी अट नाही. तरी पालिकेच्या कामासाठी तुलनात्मक दर यावेत, सर्व ठेकेदारांना विना दबाव निवदा भरता यावी म्हणून वरील अट सुचनेतून रद्द करावी. पालिकेची सुचना पारदर्शक कारभारासाठी पालिकेच्या फायदयासाठी आणि सर्व ठेकेदारांना विना दबाव ई निवदा भरता यावी यासाठी आहे. त्याचा गांर्भीयांने विचार व्हावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT