Tiger Nails esakal
सातारा

साताऱ्यात वन विभागाची मोठी कारवाई; वाघासह बिबट्याची 11 नखं जप्त

कऱ्हाडला वाघ नखी विकणाऱ्यांच्या वनविभागाने आवळल्या मुसक्या

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : शहरात वाघाची नख (Tiger Nails) विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाने (Forest Department) आज अटक केली. त्यांच्याकडून अकरा नखे जप्त केली आहेत. त्यात वाघ व बिबट्याची नखे (Leopard Nails) असावीत, असा अंदाज आहे. त्यात एक वाघ नख लॉकेटमध्ये अडकवले आहे, तर अन्य दहा नखे सुटी आहेत. दिनेश बाबूलाल रावल (वय ३८, रा. सोमवार पेठ) व अनुप अरुण रेवणकर (वय ३६, रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात वाघाची नख विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाने आज अटक केली. त्यांच्याकडून अकरा नखे जप्त केली आहेत.

वन विभागाला काल सायंकाळी त्याची माहिती मिळाली. त्या गुप्त माहितीवरून बुधवार पेठेतील कृष्णा नाका येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. त्यात त्या दोघांना अटक झाली. सातारा जिल्ह्यातील ही मोठी कारवाई आहे. मिळालेल्या वाघ व बिबट्याच्या नख्यांचे बाजरभाव मूल्य आहे. वन विभाग त्या दोघांकडे तपास करत आहे. त्यांचा आंतरराज्य टोळीशी संबंध असल्याचा संशय आहे. काही दिवसांपासून वन व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी त्या दोघांवर पाळत ठेऊन होते. काल सोमवारी ते जाळ्यात अडकले. वाघ व बिबट्याच्या नखांच्या विक्रीसाठी ते तयार असल्याची गुप्त माहिती मिळताच वन विभागाने कृष्णा नाका येथील सावित्री कॉर्नर बिल्डिंगमध्ये असलेल्या सखी लेडीज शॉपी येथे दिनेश रावल दोन वाघ नख्या घेऊन विक्रीसाठी आला होता. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन लगेचच चौकशी केली.

Leopard Nails

त्यात निष्पन्न झालेला दुसरा संशयित अनुप रेवणकर याला पकडले. त्याच्या रविवार पेठेतील काझी वड्याजवळील मयूर गोल्ड दुकानात छापा टाकला. त्याच्या जवळ आठ वाघ व बिबट्याची नखे सापडली. त्याच्या गळ्यात एक वाघ नख सापडले. दोघांनाही वनविभागाकडून अटक केली असून ते कोठडीत आहेत. ह्या कारवाईत उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यात सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे इन्स्पेक्टर डोकी आदीमाल्ल्य्या, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे स्पेशल सेलचे वनरक्षक आकाश सारडा, वनपाल आनंदा सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते, अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम, भारत खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके सहभागी झाले होते.

कोणी शिकार करत असेल, तर गोपनीय माहिती कळवा

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वाघ अथवा बिबट्यासारख्या प्राण्यांना मारून त्यांच्या नख्यांचे / दातांचे लॉकेट करून गळ्यात घालणे हा देखील मोठा व अजामिनपात्र व दाखल पात्र गुन्हा आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार शेड्यूल 1 मधील कायद्यात वाघ व बिबट्याला संरक्षण दिले आहे, जर कोणाकडेही असे वाघ नख्या असलेले लॉकेट असेल अथवा कोणी शिकारी करत असेल, तर गोपनीय माहिती कळवावी. नावाची गोपनीयता ठेवली जाईल, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानची संगीत खुर्ची! मोहम्मद रिझवानचा 'करेक्ट कार्यक्रम' करून २५ वर्षीय खेळाडूला केलं कॅप्टन

Kolhapur CBS Rada : कोल्हापूर सीबीएसवर एसटी नसल्याने प्रवासी संतापले, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय प्रकरण

'गुप्तांगाला स्पर्श करणेही बलात्कारच'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय; ड्रायव्हरने दोन मुलींवर केला होता अत्याचार

Ichalkaranji Politics : निमित्त दिवाळी शुभेच्छा, कोल्हापूरचे दादा, इचलकरंजीच्या आण्णांना भेटले; मिशन झेडपी ते महापालिका काय झाली चर्चा...

SLW vs BANW: २ धावांत ५ विकेट्स पडल्या अन् बांगलादेशने हातचा सामना गमावला; श्रीलंकेने विजयासह आव्हान कायम राखले

SCROLL FOR NEXT