Forest
Forest esakal
सातारा

खटावातील रामाच्या डोंगरात वृक्षसंपदा आगीत भस्मसात; वन्यजीवांचीही होरपळ

राजेंद्र शिंदे

खटाव : खटाव तालुक्‍यातील अंभेरी, जांब, बिटलेवाडी, रेवलकरवाडी व कोरेगाव तालुक्‍यातील अंभेरी, साप या हद्दीत येणाऱ्या रामाच्या डोंगरास दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदा व जीवसृष्टीची हानी झाल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. वन विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना येथील निसर्गप्रेमी करत आहेत.

या आगीत शेकडो जीव व वनस्पती भस्मसात झाल्या आहेत. या डोंगरावर साग, ऐन, धावडा, शिवण, पांगरा, आवळा, आंबा, बिबवा, भावा, जांभूळ, अर्जुन, सादडा, शिसू, सुबाभूळ अशी विविध प्रकारची लहानमोठी झाडे आहेत. याशिवाय करवंद, कारी, घाणेरींची अनेक झुडपे आहेत. शतावरी, मुरूड शेंग, निरगुडी, कोरपड, अश्वगंधा, दगडीफूल, चंदन, खैर, पळस, नागरमोथा, लाजाळू, अडूळसा, बेल अशा वनौषधींचा खजिना म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल वाढू लागले आहे.

येथे माकड, सांबर, हरीण, वानर, ससा, लांडगा, कोल्हा, तरस, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस, विविध प्रकारचे साप व घोरपड असे अनेक सरपटणारे प्राणी व कीटक येथे वास्तव्यास आहेत. असे विविध प्रकारचे प्राणी व शेकडो पक्षी वास्तव्यास आहेत. या आगीच्या भक्ष्यस्थानी हजारो झाडे व पशुपक्षी सापडण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. वृक्षलागवड उपक्रमांतर्गत या भागात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी हजारो रोपट्यांची लागवड केली होती. या रोपट्यांची वाढ होत असतानाच डोंगरावर लागलेल्या वणव्यात या उपक्रमातील रोपटी जळून खाक झाल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

SCROLL FOR NEXT