Vijaysingh Uthale  
सातारा

माजी नगरसेवक कबड्डीपटू विजयसिंह उथळेंचे निधन

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेचे माजी नगरसेवक व वसई विरार महानगरपालिकेचे सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर विजयसिंह उथळे (वय ७२) यांचे आज (बुधवार) पहाटे अल्पशा आजाराने त्रिपुटी (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे निधन झाले. सन १९७४ कालावधीत विजयसिंह उथळे हे अपक्ष म्हणून सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 

त्यावेळी त्यांनी सत्ताधा-यांच्या विराेधात चुकीच्या कामकाजावर सातत्याने आवाज उठवला. याबराेबरच आंदोलने छेडली. नगरसेवक पदाची त्यांची कारकीर्द खूप गाजली होती. वसई विरार महापालिकेतून प्रदीर्घ सेवेनंतर असिस्टंट कमिशनर म्हणुन सेवानिवृत्त झाले. येथील श्री शिवाजी उदय मंडळात ते कबड्डीचे सराव करीत असते. सातारचे उत्कृष्ठ कबड्डीपटू म्हणुन त्यांचा नावलाैकिक होता. 

विजयसिंह उथळे हे श्री शिवाजी उदय मंडळ सातारचे संस्थापक बबनराव उथळे यांचे पुतणे आणि राज्य पातळीवरील बुध्दिबळ खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते जयंत उथळे यांचे थोरले बंधू होत अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT