सातारा

बदलत्या काळानुसार आपल्याला बदल स्वीकारावे लागतील : मदन भोसले

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. हा निर्णय संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव गाढवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

मदन भोसले हे जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रथमच संस्थेचे अध्यक्ष झाल्याने संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना या निवडीमुळे आनंद झाला आहे. जनता शिक्षण संस्था ही पूर्वी प्राज्ञपाठशाळा या नावाने परिचित होती. त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर ती संस्था जनता शिक्षण संस्थेकडे आल्यानंतर देशभक्त किसन वीर (आबा) सुमारे दहा वर्षे अध्यक्ष होते. तद्‌नंतर ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले सुमारे 40 वर्षे अध्यक्ष होते आणि आता मदन भोसले यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. 

यावेळी मदन भोसले म्हणाले, "शिवाजी विद्यापीठातील नामवंत असे किसन वीर महाविद्यालय व संस्थेच्या सर्व शाखा प्रगतिपथावर कशा राहतील, संस्थेच्या लौकिकात व विकासात भर कशी पडेल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हल्लीचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून, बदलत्या काळानुसार आपल्याला बदल स्वीकारावे लागतील. सर्वांना बरोबर घेऊन सांघिक काम म्हणून आपण सर्वजण संस्थेला पुढे नेवूया.''संस्थेला अभिमान वाटेल असेच काम आपल्या हातून होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष प्रतापराव भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुरेश यादव, केशवराव पाडळे, शंकरराव खरात, रमाकांत वीर, नारायण चौधरी, सुधाकर देवकुळे, शिवाजी बाबर, संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT