सातारा

सातारा जिल्ह्यातील जावळी,पाटण तालुक्यातील बाधितांचा मृत्यू; नव्याने 46 कोरोनाबाधित 

सकाळ वृत्तसेवा

सातारा  : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 39, प्रवास करुन आलेले चार, सारीचे व आयएलआय तीन असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय, पुनवडी येथील 60 वर्षीय व पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुष या तीन कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे, अशी  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
कोरोना बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील गोकुळ येथील 29 वर्षीय महिला, कोयना नगर येथील 45, 48, 60 वर्षीय पुरुष,कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, दबाचामाळ येथील 14 वर्षीय युवक, कडवे बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, सदादाढोली येथील  85 वर्षीय महिला, माण तालुक्यातील म्हसवड येथील 53 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवती, दोरगेवाडी येथील 22, 55,   वर्षीय महिला व 13 व 19 वर्षी युवती, 40 वर्षीय पुरुष, इंजबाव येथील 28 वर्षीय पुरुष, मार्डी येथील 42 वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील  तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, कोटीवले येथील 30 वर्षीय महिला, तारुख येथील 26 वर्षीय महिला, शामगाव येथील 49 वर्षीय पुरुष, सुपणे येथील 28 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील जिहे येथील 7 वर्षाचा बालक, खावली येथील 52 वर्षीय पुरुष, जिहे येथील 50 वर्षीय पुरुष,  70 व 85 वर्षीय महिला, भरतगाव येथील 48 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 32 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील केंजळ येथील 23, 48, 27 वर्षीय पुरुष व 48,70, 30, 25 वर्षीय महिला, पसरणी येथील 30 व 52, 44  वर्षीय महिला, जावली तालुक्यातील पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुष, कास येथील 38 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तीन बाधिताचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच जावली तालुक्यातील पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुषाला उपचाराकरिता क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल करण्यात आले होते. त्याचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. उपचारादरम्यान घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित आला आहे. तसेच खासगी प्रयोग शाळेत तपाणी करुन कोरोना बाधित असलेला 28 वर्षीय पुरुष काल रात्री उशिरा मुंबई येथून प्रवास करुन क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल झाला आहे.

नव्या आदेश वाचा, लग्नात लिंबू धरण्यास मामाही उपस्थित राहू शकणार नाही


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...

Latest Marathi News Update : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशीम जिल्ह्यात दुसरा दिवस

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Kolhapur Crime: काेल्हापुरातील पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ पार्लरवर छापा; माजी नगरसेवकावर गुन्हा, साडेचार लाखांची एकवीस मशीन ताब्यात

TET 2026 Paper Leak : त्यांच्याकडे आमदार-खासदार फोडण्याचे कौशल्य; टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर अभिजित दीपकेंची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT