सातारा

आमचं कार्यालय सांगलीला पळविण्याचे कारण काय? शेतकरी आक्रमक

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कृष्णा कालव्याचे ओगलेवाडी येथील विभागीय कार्यालय सांगलीला हलविण्याचा घाट वरिष्ठ पातळीवरून घातला जात आहे. मुळातच कालव्याचे उगमस्थान कऱ्हाड तालुक्‍यात आहे. शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालये याच तालुक्‍यात राहणे संयुक्तिक आहे. मात्र, काही अज्ञात शक्ती हे कार्यालय सांगलीला हलविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. हा डावपेच लाभधारक शेतकऱ्यांच्या तोट्याचा होत असल्याने तेही आक्रमकतेच्या पवित्र्यात आहेत. 

खोडशी येथे कृष्णा नदीवर बंधारा बांधून तेथून कृष्णा कालवा तयार करण्यात आला आहे. कऱ्हाड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्‍यांतील हजारो हेक्‍टर शेतीसाठी हा कालवा वरदायी ठरला आहे. कालव्याचे प्रशासकीय कामकाज कऱ्हाड तालुक्‍यातील दोन व वाळवा, पलूस तसेच तासगाव तालुक्‍यात प्रत्येकी एक अशा तीन कार्यालयांतून चालते व सांगलीला विभागीय कार्यालय आहे. यापैकी कऱ्हाड येथे उपविभाग कार्यालय आहे. शेणोली येथील शाखा कार्यालय व कऱ्हाड कार्यालयातून कामकाजाचा गाडा सुरळीतपणे चालवला जातो. परंतु, काही महत्त्वपूर्ण कामकाज सांगलीतील कार्यालयात होत असल्याने अधिकारी व शेतकऱ्यांना इतक्‍या दूर पायपीट करावी लागते.

ही समस्या दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये ओगलेवाडी येथे विभागीय कार्यालयाची निर्मिती केली. कऱ्हाडला तिन्हीही कार्यालये असल्याने अधिकारी व शेतकऱ्यांचा नाहक त्रास कमी झाला. मात्र, सध्या हे कार्यालय सांगलीला हलविण्याचा घाट वरिष्ठ पातळीवरून घातला आहे. काही अज्ञात शक्ती याकामी कार्यरत आहेत. परंतु, हा डावपेच लाभधारक शेतकऱ्यांच्या तोट्याचा ठरत असल्यामुळे ते आक्रमक पवित्र्यात आहेत. याबाबत तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. मुळातच कृष्णा कालव्याचे उगमस्थान असणाऱ्या तालुक्‍यात विभागीय कार्यालय असणे यात गैर काय? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. कार्यालय सांगलीला हलवत असल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

""शेतकऱ्यांच्या सुविधेस अन्यत्र हलविणे चुकीची बाब आहे. कृष्णा कालवा विभागाचे ओगलेवाडी कार्यालय हलवले जात असल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू. याबाबत लोकप्रतिनिधींना भेटून त्यांचे लक्ष वेधणार आहे.'' 

-दीपक पाटील, शेरे, राज्य संघटक, बळीराजा शेतकरी संघटना 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

दुर्दैवी ! बिल्डिंगवरून पडल्याने 37 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव

Latest Marathi News Updates Live : सर आम्हाला सोडून जाऊ नका, विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

SCROLL FOR NEXT