सातारा

निर्ढावलेल्या बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, शेळ्यांचाही फडशा!

कृष्णात साळुंखे

चाफळ (जि. सातारा) : बिबट्याच्या हल्ल्यात कोचरेवाडी (ता. पाटण) येथील दत्तात्रय मारूती मोहिते यांची शेळी ठार, तर मारूती पांडुरंग मोहिते यांची शेळी जखमी झाल्याची घटना शिरू मळी नावाच्या शिवारात घडली. चाफळ-पाडळोशी रोडवर धरणाजवळ सायंकाळी सात वाजता पाडळोशी येथील समाधान पाटील यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. गाडी वेगाने पळवल्याने पाटील हे या हल्ल्यातून थोडक्‍यात बचावले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात आले असतानाच आता बिबट्या दुचाकी स्वारांवर हल्ला करू लागल्याने वनविभागाने आता तरी बघ्याची भूमिका पार न पाडता ठोस उपाय योजना करण्याची वेळ आली आहे. चाफळ व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर कायम आहे. 

बिबट्यांकडून वारंवार शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरावर हल्ला चढवून ठार मारण्याच्या घटना घडत आहेत. बिबट्याने काही दिवसांपासून थेट मानवी वस्तीत प्रवेश करत अनेक शेळ्यांचा फडशा पाडला आहे. पाळीव जनावरांवर हल्ला करणारा व निर्ढावलेला हा बिबट्या आता दुचाकीस्वारावर हल्ला करू लागल्याने ग्रामस्थ दिवसाही घराबाहेर पडण्यास घाबरु लागले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

Pune News: सांत्वन नको; आम्हाला ठोस मदत करा; दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

Bengaluru Drug Bust : हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त! केरळमधील दोन पदवीधरांना अटक, 11.50 कोटींचे अमली पदार्थ जप्त

युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात भूकंप, 'या' कंपन्यांचे शेअर्स गडगडले

Manoj Jarange Patil: सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन: मनोज जरांगे पाटील, सात तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित!

SCROLL FOR NEXT