सातारा

सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला; माणच्या फरारी संशयितास अटक

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करून पाच वर्षांपासून फरारी असलेला संशयित संतोष हणमंत पवार यास स्वरूपखानवाडी (ता. माण) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. 

19 मार्च 2015 रोजी आंधळी (ता. माण) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदाचे निवडणुकीच्या वेळी दोन गटांमध्ये मारामारी झाली होती. या वेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार नीलेश डोंबे यांना मारहाण झाली होती. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. दोन नागरिकही जखमी झाले होते. त्याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सावळेराम कवडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत 108 संशयितांना अटक करून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. 

या गुन्ह्यातील फरारी संशयित संतोष पवार यास ताब्यात घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवडी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयितास पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी तयार केलेल्या पथकामार्फत ताब्यात घेऊन दहिवडी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत. ही कारवाई पोलिस शिपाई तानाजी चंदनशिवे, रमेश बर्गे, अनिल वाघमोडे, सुहास गाडे व गणेश पवार यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT