Coronavirus esakal
सातारा

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता 'जावळी पॅटर्न'; शिक्षण विभाग देणार 15 लाखांचा निधी

शिष्यवृत्तीच्या 'जावळी पॅटर्न'मुळे राज्यात आघाडीवर असलेला शिक्षण विभाग आता कोरोना निर्मूलनासाठी पुढे आला आहे.

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : शिष्यवृत्तीच्या 'जावळी पॅटर्न'मुळे राज्यात आघाडीवर असलेला शिक्षण विभाग आता कोरोना निर्मूलनासाठी पुढे आला आहे. कोरोनविरुद्धच्या लढाईत (Coronavirus) जावळी तालुका शिक्षण विभाग सामाजिक (Jawali Taluka Education Department) बांधिलकीतून 15 लाख रुपयांचा निधी उभारणार आहे. (Fund Of 15 Lakhs From Jawali Taluka Education Department For Eradication Of Coronavirus)

जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मदतनिधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी जावळी तालुक्‍यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन तालुकास्तरीय बैठक घेऊन मदतनिधीबाबत आवाहन केले. त्यास सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रतिसाद देत प्रतिशिक्षक दोन हजार रुपये मदतनिधी देण्याचे मान्य केले. ही आर्थिक मदत देण्यासाठी सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, कर्मचारी पुढे आले असून, जमा होणाऱ्या रकमेतून तालुक्‍यात दहा व्हेंटिलेटर बेडचे सुसज्ज असे कोरोना सेंटर उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

या ऑनलाइन सभेला प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते यांनी मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या चर्चेत सुरेश चिकणे, सुरेश जेधे, दीपक भुजबळ, सूर्यकांत पवार, सुनील धनावडे, रघुनाथ दळवी, सुरेश शेलार, मिलन मुळे, संदीप किर्वे, गणेश तोडकर, संपत धनावडे, अजय पाडळे यांनी भाग घेतला. या वेळी सभापती जयश्री गिरी, माजी सभापती अरुणा शिर्के, उपसभापती सौरव शिंदे, दत्तात्रय गावडे, विजय सुतार, कांताबाई सुतार, तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अशोक लकडे यांनी स्वागत केले. अरविंद दळवी यांनी आभार मानले. ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या सहकार्याने या विशेष बैठकीचे आयोजन केले होते. जावळीच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, दीपक पवार, अर्चना रांजणे यांनी कौतुक केले आहे. सप्टेंबरमध्ये पहिल्या लाटेवेळी जावळी तालुक्‍यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये काढून सात लाखांपर्यंत निधी जमा केला होता.

जावळी तालुक्‍यातील शिक्षण विभागाने सामाजिक बांधिलकीतून कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय सहभाग दाखवला आहे. त्यामुळे बाधितांवर वेळेत उपचार होतील. शिक्षण विभागाच्या या विधायक उपक्रमामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल.

-कल्पना तोडरमल, गटशिक्षणाधिकारी, जावळी

Fund Of 15 Lakhs From Jawali Taluka Education Department For Eradication Of Coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: युती ठरली, पण महायुतीचे राजकारण पुन्हा उघडे; 122 जागांवर एकमत, मनसे 50–55 जागा लढवणार

Pune Water Issue : वारजे मुख्य जलवाहिनीत गळती; चांदणी चौक, बाणेर-बालेवाडी परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT