Funeral of martyr Chandrakant Jadhav 
सातारा

हुतात्मा चंद्रकांत जाधव यांना अखेरचा निरोप

ग्रामस्‍थांना अश्रू अनावर; कातळगेवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

विसापूर - पंजाब प्रदेशात कर्तव्य बजावताना वयाच्या ४४ व्या वर्षी वीरमरण आलेले कातळगेवाडी (निढळ, ता. खटाव) येथील आर्मी एअर डिफेन्सचे १४४ एडी रेजिमेंटचे हवालदार हुतात्मा चंद्रकांत प्रभाकर जाधव यांच्या पार्थिवावर आज (रविवार) कातळगेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील नागरिक व आजी-माजी सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पंजाब येथील चंदी मंदिर येथून आपल्या युनिटकडे परतताना प्रवासात हृदयविकाराचा झटका आल्याने चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. या घटनेची बातमी समजताच कातळगेवाडीसह तालुक्यात शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी ८.०० वाजता कातळगेवाडी येथे आणण्यात आले. सुरुवातीला पार्थिव घरी पोचताच विजय शिंदे यांच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. ‘चंद्रकांत जाधव अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’च्या जयघोषात चंद्रकांत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, हुतात्मा चंद्रकांत जाधव यांचे पहिली ते चौथी शिक्षण कातळगेवाडी येथे तर चौथी ते दहावी शिक्षण निढळ येथे झाले व अकरावी, बारावीचे शिक्षण महिमानगड विद्यालयात झाले. त्यानंतर ते फौजमध्ये भरती झाले. त्यांनी २४ वर्षे देशसेवा बजावली. त्यांच्या वडिलांनीदेखील देशसेवा बजावली असून त्यांचे दोन भाऊ देशसेवेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT