म्हसवड - येथील व्यापारी जवाहरलाल मोतीलाल शहा यांच्या सातारा-लातूर रस्त्यालगतच्या सह्याद्री ढाब्यासमोरी गोडाऊनला काल (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत गोडाऊनमधील नवीन इमारतीस लागणारे प्लबिंग प्लॅस्टिक पाइपसह साहित्य व फर्निचर जळून खाक झाल्याची घटना घडली.
अचानकपणे लागलेल्या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. या गोडाऊनमध्ये प्लॉस्टिक पाइप्स असल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला व या गोडाऊनचा सभोतालचा परिसर काळ्या धुराने व्यापून गेला. सुमारे पाच किलोमीटर अंतरावरून उंच धुराचे लोट निदर्शनास येत होते. आगीच्या घटनेची माहिती म्हसवड पालिकेच्या अग्निशमन दलास देण्यात आली. परंतु, अग्निशमन बंब दुरुस्तीसाठी कोल्हापूर येथे पाठविली गेल्यामुळे आग विझविण्यात मोठे अडथळे येत होते. नागरिकांनी तीन खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी पाचारण करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, पुरेसे यश येत नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येताच अखेर पालिकेच्या एसटीबीच्या प्रेशरने पाण्याचा फवारा मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिकांची गर्दी वाढू लागल्यामुळे घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या घटनेत जवाहरलाल शहा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.