सातारा

शिल्लक गणेशमूर्तींमुळे व्यावसायिक अडचणीत, कोरोनामुळे फिस्कटले कारागिरांचे आर्थिक गणित

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे येथील बाजारपेठ मध्यंतरी अनेक दिवस बंद ठेवल्याचा जबर फटका गणेशमूर्ती कारागीर आणि स्टॉलधारकांना बसला. प्रतिवर्षी गणेश चतुर्थीला रिकामेपणाची हुरहूर खायला उठणाऱ्या त्यांच्या घरात व स्टॉलवर शनिवार (ता. २२) मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीं शिल्लक राहिल्याने चिंतेचे वातावरण दिसून आले. 

कोरोनाचे रुग्ण आणि त्यांच्या निकट सहवासातील काही व्यक्ती ढेबेवाडी बाजारपेठेच्या संपर्कात आल्याचे समोर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसांत अनेकदा बाजारपेठ बंद ठेवावी लागली. त्याचा सर्वाधिक फटका अन्य व्यावसायिकांबरोबर गणेशमूर्ती कारागीर आणि स्टॉलधारकांना बसला. कारागिरांनी नेहमीप्रमाणे बाजारपेठेत भाड्याने गाळे घेऊन त्यांच्याकडील मूर्ती मांडल्या. अनेक व्यावसायिकांनीही स्थानिक कारागीर, तसेच कऱ्हाड, उंब्रज, मसूर, कोल्हापूर येथून गणेशमूर्ती आणल्या.

मात्र, वारंवार बंद होणारी बाजारपेठ, तसेच ठप्प झालेली अंतर्गत वडाप व एसटी वाहतूक यामुळे मूर्ती ठरविण्यासाठी ढेबेवाडीत येणाऱ्यांचा ओघ कमी झाला होता. अशा स्थितीत काही ठिकाणी स्थानिकांनी गावातच मूर्तींचे स्टॉल सुरू करून नागरिकांना पर्याय उपलब्ध करून दिल्याने येथील परंपरागत कारागीर व व्यावसायिकांसमोर अडचणी अधिकच वाढल्या. `एक गाव, एक गणपती'मुळे अनेक गणेश मंडळांनी ठरविलेल्या मूर्ती ऐनवेळी रद्द केल्याने अडचणी वाढलेल्या असतानाच आजूबाजूच्या गावातून नेहमीसारखा प्रतिसाद न मिळाल्याने चिंतेत असलेले व्यावसायिक व कारागीर गणेश चतुर्थी दिवशी तरी गर्दी वाढेल या आशेवर होते. 

मात्र, त्यांची निराशाच झाली. गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने काढलेल्या नोटिसा आणि पोलिसांकडून त्याबाबत केल्या जाणाऱ्या अंमलबजावणीचा घोळ मिटवता मिटवता सकाळी काही तास त्यांची पुरेवाट झाली. नंतर दिवसभर बाजारपेठेत सन्नाटाच राहिल्याने शिल्लक राहिलेल्या गणेशमूर्ती सायंकाळी घरांकडे हलविण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू होती. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे यंदा फटका बसल्याचे अनेक कारागीर व व्यावसायिकांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT