girls Khirkhandi got mechanical boat sakal
सातारा

खिरखंडीतील मुलींना मिळाली यांत्रिक बोट

बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा

कास : खिरखंडी (ता. जावळी) येथील मुलींच्या शिक्षणासाठीची धावपळ व विदारक परिस्थिती सर्वांसमोर आली. असुरक्षित अशी लाकडाची होडी चालवत येत असल्याने या मुलींना कोयना विभागाचे सुपुत्र व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्व खर्चाने यांत्रिक बोट उपलब्ध करून दिली. आज पहिल्यांदाच या मुलींनी या बोटीतून प्रवास करत शाळा गाठली.

दै. ‘सकाळ’मधून खिरखंडीतील मुलींच्या शिक्षणाबाबतची दुरवस्था मांडली होती. या वृत्तानंतर इतर माध्यमांनी हा विषय उचलून धरल्याने मुंबई उच्च न्यायालयानेही या मुलींची दखल घेतली. दुर्गम बामणोली खोऱ्यातील खिरखंडीतून कोयना जलाशय पार करत पुन्हा अंधारीपर्यंत चार- पाच किलोमीटरचा घनदाट जंगलातील प्रवास करत या मुली शाळेत पोचत होत्या.

ही परिस्थिती पाहून मूळ दरे गावी आलेल्या मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ या मुलींना रोज शाळेत कोयना जलाशय पार करून सकाळी आणि संध्याकाळी सोडण्यासाठी यांत्रिक बोट उपलब्ध करून दिली. खासदार शिंदे यांनी प्रत्यक्ष खिरखंडीला भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या बोटीमुळे मुलींचा रोजचा होडी चालवण्याचा त्रास कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुलींना फायबर बोट उपलब्ध करून दिली जाणार आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लाइफ जॅकेट उपलब्ध करून दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT