Vardhish Ligade Sakal
सातारा

चिमुकल्या वर्धिशकडून गिरनार सर; पर्वत रांगातील १० हजार पायऱ्यांची मोहीम फत्ते

कऱ्हाड येथील सदाशिव ट्रेकिंग ग्रुपचा सात वर्षीय चिमुकला मावळा वर्धिश लिगाडे यांने गुजरातमधील अवघड मानल्या जाणाऱ्या गिरनार पर्वतरांग नुकतीच सर केली.

हेमंत पवार

कऱ्हाड - येथील सदाशिव ट्रेकिंग ग्रुपचा सात वर्षीय चिमुकला मावळा वर्धिश लिगाडे यांने गुजरातमधील अवघड मानल्या जाणाऱ्या गिरनार पर्वतरांग नुकतीच सर केली. तब्बल १० पायऱ्यांचा टप्पा केवळ साडेपाच तासांत पूर्ण करत वर्धिशने गिरनार मोहीम फत्ते केली आहे.

वर्धिश हा लिगाडे- पाटील महाविद्यालयाचे संस्थापक उपाध्यक्ष विजय लिगाडे यांचा चिरंजीव आहे. मलकापूरमधील कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वरिष्ठ गटात शिक्षण घेणाऱ्या वर्धिशला वयाच्या तिसऱ्या- चौथ्या वयापासून ट्रेकिंगची आवड आहे. वडील विजय लिगाडे सदाशिव ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य असल्याने किल्ले सदाशिवगडसह किल्ले वसंतगड, दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड यासह अनेक छोटे- मोठे किल्ले वर्धिशने यापूर्वीच सर केले आहेत. सदाशिव ट्रेकिंग ग्रुपच्या १६ सदस्यांनी नुकतीच गुजरातमधील गिरनार मोहीम केली. या मोहिमेत चिमुकला वर्धिशही सहभागी झाला. प्रारंभीच्या डोंगर रांगातील सुमारे पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पार करताना भल्याभल्यांची कसोटी लागते.

मात्र, चिमुकल्या वर्धिशने वडील विजय लिगाडे यांच्यासोबत सहजपणे हा टप्पा पार केला. याशिवाय हा संपूर्ण ट्रेक साडेपाच तासात न थकता पूर्ण केला. एवढ्या लहान वयात एवढी अवघड मोहीम पूर्ण केल्याने किल्ले सदाशिवगड येथे सदाशिव ट्रेकिंग ग्रुप, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, तसेच सदाशिवगड दुर्गरक्षकांकडून वर्धिशचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT