Satara Assembly Election 2024  sakal
सातारा

Satara Assembly Election 2024 : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची कराडच्या विमानतळावर तपासणी

Satara Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर राज्यात त्या संदर्भात त्यांनी चांगलेच रान उठवले होते. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बॅगांची गुरुवारी गोव्याकडे रवाना होण्यापूर्वी कराड येथील विमानतळावर तपासणी करण्यात आली.

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कराड : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर राज्यात त्या संदर्भात त्यांनी चांगलेच रान उठवले होते. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ बैठकीसाठी बुधवारी कराड ( जि.सातारा ) दौऱ्यावर आले होते.

ते आज गुरुवारी गोव्याकडे रवाना होण्यापूर्वी कराड येथील विमानतळ परिसरात निवडणुक यंत्रणेकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते व महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. असे असताना मध्यंतरी माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची हेलिकॉप्टर मध्ये बसत असताना बॅग तपासण्यात आली होती. त्यावरून राज्यात मोठी राळ उडाली होती.

दरम्यान महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या बैठकीचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.

बैठक आटोपून आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री कराड विमानतळावरून गोव्यासाठी रवाना होणार होते. तत्पूर्वी निवडणूक विभागाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे सध्या त्याची चर्चा सुरू झाली आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

ITR Deadline: सर्वांसाठी 31 जुलैची तारीख नाही! शेअर बाजारातील एक ट्रेड केला तरी बदलू शकते ITR डेडलाइन; पाहा नियम

माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT