Aarti By Widow Women Sakal
सातारा

गोंदवल्यातील अशिक्षित महिला बनल्या विधवा प्रथेसाठी संहारक दुर्गा

मागासवर्गीय व अशिक्षित असल्याने कायमच दुर्लक्षित राहिलेल्या गोंदवल्याच्या 'जलदुर्गां'नी देवीची आरती विधवेकडून करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे.

फिरोज तांबोळी

मागासवर्गीय व अशिक्षित असल्याने कायमच दुर्लक्षित राहिलेल्या गोंदवल्याच्या 'जलदुर्गां'नी देवीची आरती विधवेकडून करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे.

गोंदवले - मागासवर्गीय व अशिक्षित असल्याने कायमच दुर्लक्षित राहिलेल्या गोंदवल्याच्या 'जलदुर्गां'नी देवीची आरती विधवेकडून करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ही आगळ्यावेगळा रीत अखंडित सुरू ठेवण्याचा निर्धार या मंडळाच्या महिलांनी केला आहे.

गोंदवले खुर्द गावात अद्याप विधवा प्रथा बंदी झालेली नाही. परंतु ही कुप्रथा बंद करून महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून मागासवर्गीय समाजातील महिलांकडून प्रयत्न सुरू आहेत. मंडळात निम्म्याहून अधिक विधवा महिला असलेल्या इंदिरानगरमधील जलदुर्गा सामाजिक महिला मंडळाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने ही कुप्रथा मोडीत काढण्याची सुरुवात स्वतःपासूनच केली आहे.

नवरात्रीनिमित्त आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्याचा पहिला मान विधवांना देऊन या 'दुर्गा'नी पाहिले पाऊल टाकले होते. संधी मिळेल तिथे विधवांना सन्मान देण्याचा विडा उचललेल्या या मंडळाने गुरुवारी रात्री देवीच्या आरतीचा मान विधवा महिलेला देऊन समाजात आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या महिलांच्या प्रयत्नांना यानिमित्ताने यश आले आहे. विधवा प्रथा बंदीसाठी मंडळाच्या भारती अवघडे, मालन खवळे, कांता आवळे, अनिता मदने, प्रतीक्षा अवघडे, हिराबाई अवघडे, सावित्रीबाई बनसोडे, रक्षिता बनसोडे या महिला वसंत खवळे, सुरेश अवघडे, कुमार बनसोडे, आनंदा जाधव, जालिंदर हजारे, असिफ मुल्ला व ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्रयत्नशील आहेत.

विधवांना सन्मानित करण्यासाठीचा हा उपक्रम कायम सुरूच ठेवण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमातच विधवांना हळदी कुंकू लावून हिरवा चुडा भरण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संगीता जाधव यांनी दिली.

दरम्यान, देवीच्या आरतीसाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनीही आवर्जून उपस्थिती लावली होती. जलदुर्गाने विधवांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विधवा असल्याने समाजात मानाचे स्थान मिळत नसल्याची सल होती. परंतु देवीच्या आरतीचा मान मिळाल्याने खूप आनंद झाला. इतर महिलांनाही समाजात सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

- शोभा अवघडे, गोंदवले खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT