सातारा

कवठेच्या उपसरपंचपदी गोरख चव्हाण बिनविरोध

पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गोरख चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच संदीप डेरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपदासाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत गोरख चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय. एन. टोणपे यांनी काम पाहिले. त्यांना मंडलाधिकारी जाधव, ग्रामसेवक भोसले, तलाठी राठोड यांनी सहकार्य केले. निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते कृष्णराव डेरे यांनी उपसरपंच गोरख चव्हाण यांचा सत्कार केला. बिनविरोध निवडून दिल्याबद्दल उपसरपंच चव्हाण यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार मानून सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक काम करणार असल्याचे सांगितले.

पर्यटकांनाे! महाबळेश्वर, पाचगणीला आलात 'हे' नियम पाळा

या वेळी सरपंच श्रीकांत वीर, माधवराव डेरे, मधुकर डेरे, संदीप डेरे, उज्ज्वला पोळ, रामदास ससाणे, रूपाली जगताप, नितीन ससाणे, दत्तात्रय पोळ, महेश डेरे, दिनकर डेरे, महेंद्र जगताप उपस्थित हाेते. यावेळी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच गाेरख चव्हाण यांचे अभिनंदन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT